साडे तीन हजारांपेक्षा जास्त चाईल्ड पॉर्नसाईट्सवर केंद्राची बंदी!

चाईल्ड पॉर्नोग्राफीसंबंधित साडे तीन हजारांपेक्षा जास्त वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शुक्रवारी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दली. मात्र या वेबसाईट्सच्या कंटेटला आळा घालण्यासाठी स्कूल बसमध्ये जॅमर लावणं शक्य नसल्याचंही सरकारने स्पष्ट केलं.

साडे तीन हजारांपेक्षा जास्त चाईल्ड पॉर्नसाईट्सवर केंद्राची बंदी!

नवी दिल्ली : चाईल्ड पॉर्नोग्राफीसंबंधित साडे तीन हजारांपेक्षा जास्त वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शुक्रवारी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दली. मात्र या वेबसाईट्सच्या कंटेटला आळा घालण्यासाठी स्कूल बसमध्ये जॅमर लावणं शक्य नसल्याचंही सरकारने स्पष्ट केलं.

अतिरिक्त महाधिवक्ता पिंकी आनंद यांनी न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती एम. ए. खानविलकर आणि न्यायमूर्ती एम. शांतनागोदर यांच्यासमोर केंद्र सरकारची बाजू मांडली.

सरकारकडून चाईल्ड पॉर्नोग्राफी साईट्सवर बंदी आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. तसंच सीबीएसई शाळांमध्ये जॅमर लावण्याबाबतीत निर्णय घेण्याचाही विचार सुरु आहे, असं पिंकी आनंद यांनी सांगितलं.

स्कूल बसमध्ये जॅमर लावणं शक्य नसल्याचं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं. सरकारने चाईल्ड पॉर्नोग्राफीसंबंधित वेबसाईट्सवर बंदी आणण्यासाठी काय पावलं उचलली आहेत, त्याचा अहवाल दोन दिवसात सादर करा, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 ऑगस्टला होईल.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV