LIVE UPDATE मध्य गुजरातमध्ये कमळ फुलण्याची चिन्हं

मध्य गुजरात निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE

LIVE UPDATE मध्य गुजरातमध्ये कमळ फुलण्याची चिन्हं

गांधीनगर : मध्य गुजरात निवडणूक 2017 निकाल जाहीर होत आहेत. मध्य गुजरातमध्ये भाजप 22, तर काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर आहे.

गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजप सरकार स्थापन करणार की काँग्रेस सत्तारुढ पक्षाला शह देणार हे आज स्पष्ट होणार आहे.

मध्य गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण जागा 40 जागा आहेत. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा असून 92 हा बहुमताचा आकडा आहे.

गुजरातचा एक्झिट पोल: मध्य गुजरातचा कौल भाजपला!


मध्य गुजरातमध्ये भाजपला कौल मिळण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपला 24, तर काँग्रेसला 16 जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. इतर किंवा अपक्षांना मध्य गुजरातमध्ये खातं उघडता येणार नसल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

गुजरातचा रणसंग्राम : निकालाचा क्षणाक्षणाचा थरार कसा पाहाल?


गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांमधील 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 14 जिल्ह्यांमधील 93 जागांसाठी मतदान झालं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: central Gujarat assembly elections 2017 results live latest news, Elections Results News in marathi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV