LIVE- सरन्यायाधीशांची पत्रकार परिषद रद्द

सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे देशाच्या महाधिवक्त्यांसोबत पत्रकार परिषद घेणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केली.

LIVE- सरन्यायाधीशांची पत्रकार परिषद रद्द

नवी दिल्ली: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आपली प्रस्तावित पत्रकार परिषद रद्द केली आहे.

चार न्यायमूर्तींनी इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन, सुप्रीम कोर्टाचं कामकाज नीट चालत नसल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर, खुद्द सरन्यायाधीशही आपली बाजू मांडणार होते. त्यासाठी सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे देशाच्या महाधिवक्त्यांसोबत पत्रकार परिषद घेणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केली.

चार न्यायधीशांचे थेट आरोप

"सुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर प्रश्न मांडले, पण काहीच उपयोग झाला नाही", अशी हतबलता दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.

विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात सीनियर आहेत.

न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरासमोर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

संबंधित बातम्या

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाचे मुद्दे

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Chief Justice of India Dipak Misra cancels press conference
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV