सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा

सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा

बीजिंग : भारत आणि चीनमधील संबंधांतला तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतानं सिक्कीमच्या डोंगलांगमधून सैन्य हटवावं, अन्यथा चीनी नागरिकांना भारतात जाऊ देणार नाही, असा इशारा चीनने दिला आहे.

चीनच्या नागरिकांना भारतात जाण्यापासून मज्जाव घातला जाईल. तसंच सध्या भारतात असलेल्या चीनच्या नागरिकांनाही मायदेशी परत बोलवण्याचे आदेश दिले जातील, अशी धमकी चीनच्या परदेश मंत्रालने दिली आहे.

कोणताही देश युद्ध पुकारण्यापूर्वी अशा प्रकारचा सूचना जारी करतो. त्यामुळे चीन युद्ध पुकारण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चीनचा दावा काय?

'चीन सिक्कीमजवळ रस्ता बांधत असल्याचं सांगून भारत जगाची दिशाभूल करत आहे. मात्र भारत आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करुन दुसऱ्या देशाच्या हद्दीत आपले सैनिक पाठवत आहे. भारताने 1954 चा पंचशील करार मोडला आहे. भारताला शांतता हवी असेल तर डोंगलांग भागातून त्याने सैन्य हटवावं. अन्यथा परिस्थिती बिकट होईल. भारतात असलेल्या चीनी नागरिकांसाठी आम्हाला सूचना जारी कराव्या लागतील.' असा दावा चीनने केला आहे.

...अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी


भारतानं आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करुन सिक्कीम सीमेवर रस्ता बांधायला घेतल्याचा कांगावा चीननं सुरु केला आहे. प्रत्यक्षात मात्र चीनकडून सातत्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली जात आहे.

संबंधित बातम्या


… तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी


हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात


ट्रम्प यांना खुश करण्यासाठी भारतीय सैन्यदलाची घुसखोरी, चिनी मीडियाची आगपाखड


भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV