मध्य प्रदेशमधील चित्रकूट पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

मध्य प्रदेशमधील चित्रकूट विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला दणका बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा तब्बल 14,133 मतांनी पराभव केला आहे.

मध्य प्रदेशमधील चित्रकूट पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

चित्रकूट : मध्य प्रदेशमधील चित्रकूट विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला दणका बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा तब्बल 14,133  मतांनी पराभव केला आहे.

काँग्रेस आमदार प्रेम सिंह यांच्या निधनाने चित्रकूट विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली होती. एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी 9 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. यावेळी 65 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण जास्त होतं.

पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने प्रचारासाठी चांगलाच जोर लावला होता. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी तीन दिवस चित्रकूटचा दौरा केला होता.

तसेच चित्रकूट हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील शहर असल्याने, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा प्रचार केला.

पण तरीही या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नीलांश चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाल त्रिपाठींचा 14,133  मतांनी पराभव केला.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: chitrakoot assembly bypoll in madhya pradesh
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV