...आणि चुकून मुख्यमंत्री दुसऱ्याच्या गाडीत बसले!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंतिम निर्णयासाठी 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची बैठक होणार असल्याचंही कळतं आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र फक्त गुजरात निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांसोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

...आणि चुकून मुख्यमंत्री दुसऱ्याच्या गाडीत बसले!

अहमदाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडले आणि चुकून स्वत:च्या गाडीत बसण्याऐवजी घाईत दुसऱ्याच गाडीत बसले. अहमदाबादमध्ये हा प्रसंग घडला.

नेमकं काय झालं?

भाजपाध्यक्ष अमित शहांना भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडल्यानंतर त्यांना पत्रकारांनी गराडा घातला आणि पश्नांची सरबत्ती सुरु केली. या गोंधळात मुख्यमंत्र्यांची गाडी चुकली आणि ते दुसऱ्याच गाडीत जाऊन बसले. मात्र जेव्हा ड्रायव्हर चुकीचा आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी गाडीतून काढता पाय घेतला आणि दुसऱ्या गाडीत बसले.

अहमदाबादेत शाह-फडणवीस भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंतिम निर्णयासाठी 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची बैठक होणार असल्याचंही कळतं आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र फक्त गुजरात निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांसोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

त्याआधी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.

या भेटीला नारायण राणे यांनी दुजोरा दिला. मात्र चर्चा नेमकी कशावर झाली, याबाबत काहीही सांगितलं नाही. पोटनिवडणुकीबाबतची भूमिका पत्रकार परिषद घेऊन लवकरच जाहीर करु, असं राणेंनी म्हटलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: CM Devendra Fadanvis mistakenly sat in other car latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV