चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची राहुल गांधींनी घेतली भेट

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट करुन राहुल गांधींनी याबाबतची माहिती दिली.

By: | Last Updated: 06 Jan 2018 01:42 PM
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची राहुल गांधींनी घेतली भेट

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट करुन राहुल गांधींनी याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान, त्यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा हे देखील उपस्थित होते. पण काँग्रेसकडून अद्याप या भेटीची माहिती देण्यात आलेली नाही.राहुल गांधींनी कम्युनिस्ट नेत्यांसोबतचे फोटो शेअर करताना म्हटलंय की, “मेंग शियांगफेंग यांच्या नेतृत्वाखाली सीपीसीचं प्रतिनिधीमंडळ, सीपीसी केंद्रीय समितीचे सदस्यांची भेट झाली. या भेटीत त्यांच्यासोबत विचारांची देवाण-घेवाण झाली.”

दरम्यान, गेल्यावर्षी जुलैमध्ये भारत आणि चीन दरम्यान डोकलाम मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच, दुसरीकडे राहुल गांधींनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली होती. राहुल गांधींच्या या भेटीवर भाजपने जोरदार आक्षेप नोंदवला होता. भाजपने राहुल गांधींवर चिनी नेत्यांसोबत गुप्त बैठका घेण्याचा आरोप केला होता.

Rahul gandhi meet chinese ambasedor

पण काँग्रेसने भाजपचे सर्व आरोप फोटाळून लावले होते. राहुल गांधींची चिनी राजदूतांशी भेट म्हणजे शिष्टाचार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं होतं. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या चिनी राजदूतांसोबतच्या भेटीत उद्योगपती रॉबर्ट वाड्रा आणि राहुल गांधींच्या बहीण प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: congress president rahul gandhi meet chinese communist party leaders in delhi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV