कर्नाटकात काँग्रेसला भाजपपेक्षा अधिक जागा मिळतील : इंडिया टुडे सर्व्हे

‘इंडिया टुडे’नं केलेल्या सर्व्हेनुसार कर्नाटकमध्ये भाजपपेक्षा काँग्रेसचंच पारडं जड असल्याचं समोर आलं आहे.

कर्नाटकात काँग्रेसला भाजपपेक्षा अधिक जागा मिळतील : इंडिया टुडे सर्व्हे

मुंबई : गुजरात आणि इशान्येकडील राज्य काबीज केल्यानंतर आता भाजपसाठी लक्ष्य असणारी कर्नाटक विधानसभेची निवडणूक महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र ‘इंडिया टुडे’नं केलेल्या सर्व्हेनुसार कर्नाटकमध्ये भाजपपेक्षा काँग्रेसचंच पारडं जड असल्याचं समोर आलं आहे.

भाजपच्या खात्यात फक्त ७८ ते ८६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला ९० ते १०१ चा पल्ला गाठता येईल. असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.

याशिवाय जनता दल सेक्युलरला ३४ ते ४३ जागा मिळण्याची शक्यता आहे. २२४ जागा असणाऱ्या कर्नाटक विधानसभेचा बहुमताचा आकडा ११३ असल्यानं काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्तेसाठी चांगलीच चढाओढ असेल. मात्र मणिपूर गोव्यात काँग्रेसला बहुमत असूनही भाजपनं काँग्रेसच्या तोंडचा घास हिरावून घेतला होता. त्यामुळे या कर्नाटकचा गड कोण काबिज करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Congress will get more seats than BJP in Karnataka India Today Survey latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV