सुट्टीवर आलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या

रमीझ हे राजस्थानच्या सीमेवर कार्यरत होते. सध्या ते सुट्टीवर आले होते.

सुट्टीवर आलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या

श्रीनगर: दहशतवाद्यांनी सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवानाची घरात घुसून हत्या केली. बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना.

उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा जिल्ह्यात हा प्रकार घडला. रमीझ अहमद पारे असं शहीद जवानाचं नाव आहे. रमीझ हे राजस्थानच्या सीमेवर कार्यरत होते. सध्या ते सुट्टीवर आले होते.

रमीझ यांचं घर हाजीनमधील पारे मोहल्ल्यात असून दहशतवाद्यांनी नियोजनद्धपणे रमीझ यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. त्यात रमीझ यांचा जागीच मृत्यू झाला तर रमीझ यांचे वडील, भाऊ आणि चुलती गंभीररित्या जखमी झाले आहेत.

यापूर्वी दहशतवाद्यांनी 10 मे रोजी शोपिया परिसरात लेफ्टनंट उमर फैयाज यांचीही अशाच पद्धतीने हत्या केली होती. उमर फैयाज हे एका लग्नसोहळ्याला गेले होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण करुन हत्या केली होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV