'मूडीज'वर टीका करताना क्रिकेटपटू टॉम मूडी ट्रोल

विरोधकांना मोदी सरकारने घेतलेलं श्रेय आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी टीका करण्यासाठी मूडी एजन्सीच्या फेसबुक पेजचा शोध घ्यायला सुरुवात केली.

'मूडीज'वर टीका करताना क्रिकेटपटू टॉम मूडी ट्रोल

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी 'मूडीज'ने भारतीय अर्थव्यवस्थेचं केलेलं कौतुक विरोधकांना रुचलं नाही. त्यामुळे 'मूडीज'वर टीका करण्याच्या नादात हे ट्रोलर्स तोंडघशी पडले आहेत. 'मूडीज' ऐवजी अनेकांनी चक्क माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यावर तोंडसुख घेतलं.

मूडीजने नुकतंच भारतीय अर्थव्यवस्थेचं तोंडभर कौतुक केलं. यावेळी मोदी सरकारनं सुधारणांचं श्रेय घेतलं. काही विरोधकांना मोदी सरकारने घेतलेलं श्रेय आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी टीका करण्यासाठी मूडी एजन्सीच्या फेसबुक पेजचा शोध घ्यायला सुरुवात केली.

मूडीजच्या मते भारतात 'अच्छे दिन', 13 वर्षांनी रेटिंगमध्ये वाढ


मूडीजचं पेज शोधता शोधता विरोधकांना माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील टीम सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी यांचं पेज सापडलं. त्यामुळे ट्रोलर्सनी चुकून त्यांच्यावरच टीकेचा भडीमार केला. भारतीय अर्थव्यवस्थेला असं रेटिंग दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं थेट टॉम मूडी यांनाच सुनावलं.

'मूडीज'च्या रँकिंगनंतर शेअर बाजारात मोठी उसळी


टीकाकारांमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. बऱ्याचशा कमेंट्स या मल्ल्याळम आणि इंग्रजी भाषेत होत्या. अखेर काही वेळानं कार्यकर्त्यांना आपली चूक उमगली आणि त्यांनी टॉम मूडी यांची माफीही मागितली.

आर्थिक आणि संस्थात्मक सुधारणांमुळे वृद्धीची शक्यता वाढल्याने रेटिंगमध्ये सुधारणा झाल्याचं मूडीजने सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे मूडीजने भारताचं रेटिंग 13 वर्षांनी अपग्रेड केलं आहे. याआधी 2004 मध्ये भारताचं रेटिंग वाढवून ‘Baa3’ केलं होतं. तर 2015 मध्ये रेंटिंग स्थिरवरुन (स्टेबल) सकारात्मक (पॉझिटिव्ह) श्रेणीत ठेवलं होतं.

मूडीजने काय म्हटलं?

एखाद्या देशाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्यावर मूडीजचं रेटिंग ठरतं. मोदी सरकारने मागील काही काळात अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असं मूडीजने म्हटलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: CPM trolls Australian cricketer Tom Moody mistakenly with credit rating agency Moody’s latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV