बापाच्या अंत्ययात्रेत मुलींचा डान्स

कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर घरातली सर्वच मंडळी शोक व्यक्त करतात. पण राजधानी दिल्लीत एक विचित्र घटना घडली आहे. बापाच्या मृत्यूनंतर मुलीनी त्यांची अंत्ययात्रा चक्क बँड-बाजा लावून काढली. तसेच मुलींनी या यात्रेत डान्सही केला.

बापाच्या अंत्ययात्रेत मुलींचा डान्स

नवी दिल्ली : कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर घरातली सर्वच मंडळी शोक व्यक्त करतात. पण राजधानी दिल्लीत एक विचित्र घटना घडली आहे. बापाच्या मृत्यूनंतर मुलीनी त्यांची अंत्ययात्रा चक्क बँड-बाजा लावून काढली. तसेच मुलींनी या यात्रेत डान्सही केला.

वास्तविक, दिल्लीतील पान विक्रेता असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभाई लालवानी यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण शुक्रवारी त्यांचं निधन झालं. हरिभाई लालवानी यांना ‘गुटखा किंग’ म्हणूनही ओळखलं जातं.

लालवानी यांनी मृत्यूपूर्वी एक शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं की, “त्यांच्या मृत्यूनंतर कोणीही शोक व्यक्त करु नये. उलट त्यांच्या निधनादिवशी उत्सव साजरा करावा.”

लालवानींच्या इच्छेनुसार, मुलींनी वडिलांची अंत्ययात्रा अतिशय दणक्यात काढली. या अंत्ययात्रेसाठी बँड-बाजा लावण्यात आला होता. विशेष म्हणजे, मुलींनी यावेळी डान्स करुन वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली.

लालवानी यांना चारही मुलींनीच खांदा दिला. तर त्यांच्या एका मुलीने मुखाग्नी दिला.

प्रिंस गुटख्याचे मालक हरिभाई लालवानी 1990 च्या दशकात नोएडा एन्टरप्रेन्योर्स असोसिएशनचे अध्यक्ष झाले. त्यांनी 90 च्या दशकात एका छोट्या पान टपरीने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली.

व्हिडीओ पाहा

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: noida-daughters-danced-on-fathers-death
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV