चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ATM इतिहासजमा : नीती आयोग

आगामी तीन ते चार वर्षात भारतातील बहुतांश आर्थिक व्यवहार हे मोबाईलवरच होतील, असं भाकित नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवलं आहे.

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ATM इतिहासजमा : नीती आयोग

नवी दिल्ली : येत्या तीन-चार वर्षात डेबिट आणि क्रेडिट कार्डसह एटीएमही इतिहासजमा होतील, त्याच्या जागी ग्राहकांचे व्यवहार हे मोबाईल फोनवरच होतील, असं भाकित नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवलं आहे.

भारताची 72 टक्के लोकसंख्या ही 32 वर्ष वयोगटातील आहे. ही बाब अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतासाठी फायदेशीर ठरणारी आहे, असंही कांत यांनी म्हटलं आहे.

आगामी तीन ते चार वर्षात भारतातील बहुतांश आर्थिक व्यवहार हे मोबाईलवरच होतील. कारण क्रेडिट-डेबिट कार्ड, एटीएम हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागास ठरतील, असा अंदाज कांत यांनी व्यक्त केला. नॉएडा कॅम्पसमघ्ये अॅमिटी युनिव्हर्सिटीत त्यांना मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

मोबाईलद्वारे ट्रँझॅक्शन्स करण्याचा ट्रेण्ड आतापासूनच वाढीला लागल्याचंही ते म्हणाले.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Debit, credit cards and ATMs will be used least in next four years, predicts Niti Ayog CEO Amitabh Kant latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV