संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांची 'सुखोई'तून भरारी

सुखोईतून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांची 'सुखोई'तून भरारी

जयपूर:  देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सुखोई विमानातून भरारी घेतली. हवाई दलाच्या जोधपूर विमानतळाहून त्यांनी सुखोई-30 एमएके या विमानातून उड्डाण केलं.

Nirmala sitharaman in sukhoi 1

सुखोईतून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही सुखोईतून भरारी घेतली होती.

Nirmala sitharaman in sukhoi 2

31 स्वार्डन लॉयन यांच्याकडे संरक्षण मंत्र्यांच्या उड्डाणाची जबाबदारी होती. नुकतंच निर्मला सीतारमण यांनी आयएनएस विक्रमादित्यवर मिग-29 या विमानातून उड्डाण केलं होतं.

सुखोई-30 एमएकेआय या विमानाला एयफोर्समध्ये मानाचं स्थान आहे. भारताकडे 2020 पर्यंत तब्बल अशी 270 विमानं असतील. मिग-21 आणि मिग 27 यांच्या जागी ही लढाऊ विमानं घेतील.

Nirmala sitharaman in sukhoi 3

संरक्षण मंत्रीपद स्वीकारल्यापासून निर्मला सीतारमण या जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान सीमा, भारत-चीन सीमेवर हजेरी लावली होती. त्यांनी अरुणाचल सीमेवर हजेरी लावली होती, त्यावेळी चीन सैनिकांनीही त्यांना अभिवादन केलं होतं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Defence Minister nirmala sitharaman flew a Sukhoi 30 MKI from an air base in Jodhpur, Rajasthan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV