टॅटू असल्यास वायूसेनेत नोकरी नाहीच, हायकोर्टाचं फर्मान

वायूसेनेच्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याचं कोर्टाने नमूद केलं. कोर्टात अर्ज करताना संबंधित उमेदवाराने टॅटूचा फोटोही जमा केला नसल्याचं कोर्टाने सांगितलं.

टॅटू असल्यास वायूसेनेत नोकरी नाहीच, हायकोर्टाचं फर्मान

नवी दिल्ली : शरीरावर टॅटू काढणाऱ्या व्यक्तींना भारतीय वायूसेनेत भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार नाही. खांद्यावर पर्मनंट टॅटू काढल्यामुळे वायूसेना अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने कायम ठेवला आहे.

वायूसेनेत भरती होणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट टॅटू काढण्याची मुभा आहे. आदिवासी बांधवांच्या रीतीभाती किंवा परंपरेत बसणाऱ्या टॅटूंनाच वायूसेनेत परवानगी आहे. मात्र संबंधित उमेदवाराने गोंदवलेला टॅटू या निकषात बसत नसल्याचं जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस रेखा पाटील यांनी सांगितलं.

वायूसेनेच्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याचं कोर्टाने नमूद केलं. कोर्टात अर्ज करताना संबंधित उमेदवाराने टॅटूचा फोटोही जमा केला नसल्याचं कोर्टाने सांगितलं.

खांद्याचा आतील भाग, हाताच्या पंज्याचा मागील किंवा पुढील भाग यावरच पर्मनंट टॅटूची परवानगी असल्याचं वायूसेनेच्या वकिलांनी स्पष्ट केलं. याशिवाय, आदिवासी बांधवांच्या रीतीभाती किंवा परंपरेत बसणाऱ्या टॅटूंनाच वायूसेनेत परवानगी आहे. उमेदवाराला भरती करण्याच्या निर्णयाचा अधिकार निवड समितीकडे असल्याचंही वकिलांनी सांगितलं.

एअरमन पदावरील नियुक्ती रद्द करण्याच्या वायूसेनेच्या निर्णयाला याचिकाकर्त्याने आवाहन दिलं होतं. नियुक्तीपत्र जारी केल्यानंतर प्रमाणपत्रं देताना आपल्या शरीरावर टॅटू असल्याची माहिती आपण अधिकाऱ्यांना दिली होती, आपण लपवाछपवी केलेली नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला.

वायूसेनेच्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते, त्यानुसार याचिकाकर्त्याच्या शरीरावरील टॅटू त्या निकषात बसत नाही. त्यामुळे त्याची नियुक्ती रद्द करण्याच्या आदेशात कोणतीही गफलत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Delhi high court says you may lose Indian air force job if tattoo engraved on body latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV