दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या बायकोचा खून, 'त्या' हत्या प्रकरणी ट्विस्ट

आरोपी पंकज मेहराने लपूनछपून दुसरं लग्न केलं असून तिच्यासोबत राहण्यासाठी त्याने प्रियाचा काटा काढल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या बायकोचा खून, 'त्या' हत्या प्रकरणी ट्विस्ट

नवी दिल्ली : दोन वर्षांचा मुलगा आणि पतीसमोर गोळ्या झाडून विवाहितेची हत्या झाल्याच्या दिल्लीतील प्रकरणाला ट्विस्ट मिळाला आहे. तरुणीच्या पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

आरोपी पंकज मेहराने लपूनछपून दुसरं लग्न केलं असून तिच्यासोबत राहण्यासाठी त्याने प्रियाचा काटा काढल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

एका फायनान्सरकडून आपण 40 लाख रुपये घेतले होते. ते परत न केल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. या कर्जातूनच आपल्यावर गोळीबार झाल्याचा बनाव आरोपी पंकज मेहराने सुरुवातीला केला होता.

पती, दोन वर्षांच्या मुलासमोर विवाहितेची गोळी झाडून हत्या


बुधवारी पहाटे चारच्या सुमारास पत्नी प्रिया आणि मुलासोबत आपण कारने घरी येत होती. त्यावेळी चौघांनी आपली कार आमच्या कारसमोर नेली. झटापटीत आपल्या दिशेने झाडलेली गोळी प्रियाला लागली, असा दावा त्याने केला होता.

त्यानंतर 'त्यांची' गन लॉक झाल्याची संधी साधत आम्ही पळ काढला आणि पोलिसांना कळवत थेट हॉस्पिटल गाठलं. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी प्रियाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पंकजने गेल्या वर्षी उत्तर दिल्लीत एक रेस्टॉरंट उघडलं होतं. मात्र नुकसान झाल्यामुळे ते बंद करावं लागलं होतं. ही बाब सांगून दिशाभूल करण्याचा पंकजचा प्रयत्न होता, असं पोलिसांनी सांगितलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Delhi Woman shot dead In Car, Husband confesses murder latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV