नोटाबंदीमुळे तिरुपती बालाजी देवस्थानच्या सेवादरात वाढ होणार

नोटाबंदीमुळे तिरुपती बालाजी देवस्थानच्या सेवादरात वाढ होणार

हैदराबाद : नोटाबंदीचा परिणाम देशातील सर्वात श्रीमंत मंदिराला बसला आहे. तिरुपती बालाजी देवस्थानाच्या देणगीमध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे आता तिरुपतीमध्ये बालाजीचे दर्शन महागण्याची शक्यता आहे.

मंदिरात तिकीट आणि इतर सेवांच्या दरांमध्ये वाढ करण्याचा विचार सुरु असल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने सांगण्यात येत आहे.

नोटाबंदीआधी बालाजीला दररोज 4 ते 5 कोटी रुपयांची देणगी मिळायची. यामध्येबँकेत जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजाचाही समावेश आहे. मात्र नोटबंदीनंतर आता ही रक्कम थेट 1 ते 2 कोटींवर आली आहे.

टीटीडीचे अध्यक्ष सी कृष्णमूर्ति यांच्या माहितीनुसार, "उत्पन्नातील तोटा भरुन काढण्यासाठी आता तिकीटांच्या दरात काही वाढ केली जाऊ शकते. मात्र या वाढीसाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे." काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी असाच एक प्रस्ताव नाकारला होता.

मंदिर कमिटी 'हुंडी'च्या दानाशिवाय तिकीट आणि प्रसाद विकूनही पैसे कमावतात. या तिकीटांचे दर 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत असतात. बहुतांश भाविक दर्शनासाठी 300 रुपयांचं तिकीट खरेदी करतात. पण व्हीआयपी दर्शनाच्या तिकीटाचे दर 500 रुपये आहे. मंदिर समितीनुसार, "प्रत्येक तिकीटाच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ करुन तोटा भरुन निघू शकतो."

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV