नोटाबंदी म्हणजे संघटीत लूट,अर्थव्यवस्था उद्ध्वस्त: मनमोहन सिंह

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केली.

नोटाबंदी म्हणजे संघटीत लूट,अर्थव्यवस्था उद्ध्वस्त: मनमोहन सिंह

अहमदाबाद: नोटाबंदीला 8 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अहमदाबादमध्ये सभा घेऊन, सरकारवर हल्लोबल केला.

नोटाबंदी ही सरकारची मोठी चूक होती. नोटाबंदी म्हणजे संघटीत लूट आहे, असं मनमोहन सिंह म्हणाले.

"नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे छोट्या उद्योजकांचा कणाच मोडला आहे. देशात टॅक्स टेररिझमसारखी अवस्था आहे. कररुपी दहशतीमुळे भारतीय व्यवसायांतील गुंतवणुकीत घट झाली आहे", असा दावा मनमोहन सिंह यांनी केला.

नोटाबंदीचा उद्देश साध्य झालाच नाही, काळा पैसेवाल्यांना पकडलंच नाही. मात्र त्याचा सर्वाधिक फटका छोटे उद्योजक आणि शेतकऱ्यांना बसला आहे, असंही मनमोहन सिंह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी ही मोठी चूक होती हे मान्य करुन, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं, असं मनमोहन सिंह सोमवारी म्हणाले होते. तसंच नोटाबंदी म्हणजे ब्लंडर अर्थात विनाशकारी आर्थिक निती असल्याचंही सिंह म्हणाले होते.

यानंतर त्यांनी आज पुन्हा अहमदाबादेत सभा घेऊन सरकारचं अपयश उघडं पाडलं.

मनमोहन सिंह यांचं भाषण 
  • नोटाबंदी ही मोठी चूक, काळा पैसेवाल्यांना पकडलंच नाही

  • जीएसटीमुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्थ, सामान्य नागरिकांनाही त्रास

  • देशात टॅक्स टेररिझमसारखी अवस्था, कररुपी दहशतीमुळे भारतीय व्यवसांतील गुंतवणुकीत घट

  • नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, त्यामुळे छोट्या उद्योजकांचा कणाच मोडला

  • नोटाबंदी म्हणजे संघटीत लूट

  • नोटाबंदीचा छोटे उद्योजक, शेतकऱ्यांना फटका

  • नोटाबंदीचा उद्देश साध्य झाला नाही,  मनमोहन सिंह लाईव्ह

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Demonetisation & GST blow is complete disaster for our economy, it has broken the back of our small businesses: Manmohan Singh
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV