'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी होऊन उपजिल्हाधिकारी अडचणीत

प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुराधा अग्रवाल यांची निवड ‘कौन बनेगा करोडपती’साठी झाली. या कार्यक्रमात प्रश्नांची उत्तर देऊन पैसेही मिळवले, मात्र परत आल्यानंतर त्यांच्या बाबतीत जे झालं, त्यामुळे अनुराधा यांना धक्काच बसला.

By: | Last Updated: > Tuesday, 12 September 2017 12:11 AM
Deputy District Collector stuck in problem after participated in KBC

रायपूर : छत्तीसगडमधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्याची सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होऊन चांगलीच अडचण झाली. विषय एवढा गंभीर बनला, की छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.

मंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुराधा अग्रवाल यांची निवड ‘कौन बनेगा करोडपती’साठी झाली होती. भोपाळमध्ये ऑडिशन झाल्यानंतर अनुराधा अग्रवाल यांना कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी मुंबईला बोलावण्यात आलं.

कार्यक्रमाला जाण्यापूर्वीच आईचं निधन

अनुराधा दिव्यांग आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होऊन तिथे मिळालेल्या पैशातून भावाच्या किडनीवर उपचारासाठी पैसे जमा करणं अनुराधा यांचा उद्देश होता. या कार्यक्रमाच्या शुटिंगच्या एक दिवस अगोदरच अनुराधा यांच्या आईचं निधन झालं. मात्र कुटुंबीयांच्या सल्ल्यामुळे अनुराधा मुंबईला रवाना झाल्या.

उत्तरं देऊन पैसे मिळवले, मात्र सरकारी औपचारिकतांमुळे अडचण

अनुराधा यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन अमिताभ बच्चन यांच्यासमोरच्या हॉट सीटवर बसून प्रश्नांची खणखणीत उत्तरं दिली. त्यातून त्यांना चांगले पैसेही मिळाले. मात्र मुंबईहून परतल्यानंतर त्यांना समजलं की कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना परवानगीच देण्यात आली नव्हती.

अनुराधा यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी मिळवली होती. मात्र वेळेवर पत्र न मिळाल्यामुळे त्यांनी सुट्टी टाकून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र अनुराधा यांचा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय अमान्य करण्यात आल्याचं पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांनी अनुराधा यांना पाठवलं.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

अनुराधा यांचं प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. प्रशासकीय अधिकाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होण्याची परवानगी अधिकृतपणे परिपत्रक जारी करुन दिली जाते. मात्र राज्यातील एखाद्याची बुद्धी राष्ट्रीय स्तरावर दाखवण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना रोखलं जातं, असा घणाघात काँग्रेसने भाजप सरकारवर केला.

या प्रकरणाने राजकीय वळण घेतल्यानंतर सरकारने नमतं घेत अनुराधा यांना परवानगी दिली. मुख्यमंत्री रमन सिंह यांनी याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

सरकारने परवानगी दिल्यामुळे आता भावावर उपचार करणार असल्याचं अनुराधा यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलं. सोनी टीव्हीवरील या भागाचं प्रक्षेपण 20 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Deputy District Collector stuck in problem after participated in KBC
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवा कमांडर अब्दुल कायूम नाजरचा खात्मा
हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवा कमांडर अब्दुल कायूम नाजरचा खात्मा

श्रीनगर : कुख्यात दहशतवादी अब्दुल कायूम नाजरचा खात्मा करण्यात

विकासाला काय झालं?, राहुल गांधींकडून मोदींच्या विकास मॉडेलची खिल्ली
विकासाला काय झालं?, राहुल गांधींकडून मोदींच्या विकास मॉडेलची...

अहमदाबाद : गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल

हनीप्रीतला दिल्ली हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
हनीप्रीतला दिल्ली हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमची निकटवर्तीय

संघाकडे एके-47 सारखी शस्त्र येतात कुठून? : प्रकाश आंबेडकर
संघाकडे एके-47 सारखी शस्त्र येतात कुठून? : प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली  : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठल्याच कायद्यांतर्गत

बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही!
बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही!

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज वाढदिवस.

राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?
राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दिवशीच

तासाभराने सेल्फी पाहताना समजलं मित्र पाण्यात बुडाला!
तासाभराने सेल्फी पाहताना समजलं मित्र पाण्यात बुडाला!

बंगळुरु : सेल्फीचा नाद एखाद्याच्या जीवावर बेतल्याची अनेक उदाहरणं

हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

नवी दिल्ली : बाबा राम रहीमची निकटवर्तीय मानली जाणारी हनीप्रीत

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक
पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य

'पतंजली'च्या आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!
'पतंजली'च्या आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!

मुंबई : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख आचार्य