बाबरी मशीद : 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं होतं?

By: | Last Updated: > Thursday, 20 April 2017 10:54 AM
बाबरी मशीद : 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं होतं?

नवी दिल्ली : बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह 13 जणांवर गुन्हेगारी खटला चालणार आहे.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती पीसी घोष आणि न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या याचिकेवर हा निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी दोन वर्षात पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार असून या दरम्यान न्यायाधीशांची बदली होणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं होतं?

अयोध्येत आजपासून 25 वर्षांपूर्वी लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत.

देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी ‘जय श्री राम’चा नारा होता.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.

वरीष्ठ पोलीस अधिकारी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कारसेवकांना रोखण्याची हिंमत कुणीही करत नव्हतं. कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी आधीच दिले होते.

त्यावेळी परिस्थिती प्रतिकूल झाल्याची जाणीव झाली होती. अयोध्येत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. जेणेकरुन देशभरातून येणारे कारसेवक अयोध्येपर्यंत येणार नाहीत, असं तत्कालीन पोलीस अधिक्षक अखिलेश मेहरोत्रा सांगतात.

वेळ सरत जाईल तशी परिस्थिती भीषण होत होती. कारसेवक आणखी भडकले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र जमावाला पांगवण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती.

दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पहिला घुमट तोडण्यात आला आणि 4.55 वाजता संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. कारसेवकांनी त्याच जागी पूजा करुन राम लालाची स्थापना केली.

10 हजार पोलिसांच्या उपस्थितीत दीड लाख कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडली आणि हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस असल्याचं मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी सांगितलं. याच घटनेने देशाचं राजकारण बदललं. 6 डिसेंबर रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली आणि केंद्र सरकारने कल्याण सिंह यांचं सरकार बरखास्त केलं.

संबंधित बातम्या :

बाबरी मशीद : अडवाणी, जोशी, भारतींवर कट रचल्याचा खटला!

अडवाणी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांचं पुढे काय?

First Published:

Related Stories

पंतप्रधान मोदींकडून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा
पंतप्रधान मोदींकडून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 33 व्या ‘मन की

काँग्रेस नेते शंकर सिंह वाघेलांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत
काँग्रेस नेते शंकर सिंह वाघेलांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे...

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

अल्पसंख्यांकांवरील जुन्या वक्तव्यावरुन ओवेसींचं कोविंद यांच्यावर टीकास्त्र
अल्पसंख्यांकांवरील जुन्या वक्तव्यावरुन ओवेसींचं कोविंद...

हैदराबाद : अल्पसंख्याकासंदर्भातील जुन्या वक्तव्यावरुन एमआयएमचे

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, दोन जवान शहीद
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, दोन जवान शहीद

सुकमा (छत्तीसगड) : सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरातील

पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासोबतच्या पहिल्याच भेटीत इतिहास रचणार!
पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासोबतच्या पहिल्याच भेटीत इतिहास...

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017 1.    राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास सापळे
भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास...

जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) नियंत्रण

21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार
21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या 21

पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवसीय परदेश