VIDEO : सरपंच चषकात धनंजय मुंडे मैदानात, 30 धावांची नाबाद खेळी

परळी ग्रामीण राष्ट्रवादी विरुद्ध शहर राष्ट्रवादी असा हा सामना होता, यावेळी धनंजय मुंडे हे ग्रामीण राष्ट्रवादीकडून खेळत होते.

VIDEO : सरपंच चषकात धनंजय मुंडे मैदानात, 30 धावांची नाबाद खेळी

बीड : एरव्ही आपल्या वक्तृत्व शैलीने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काल चक्क क्रिकेट खेळताना दिसले. परळीच्या तहसील कार्यालयासमोर चालू असलेल्या सरपंच चषकामध्ये धनंजय मुंडे मैदानात उतरले होते.

परळी ग्रामीण राष्ट्रवादी विरुद्ध शहर राष्ट्रवादी असा हा सामना होता, यावेळी धनंजय मुंडे हे ग्रामीण राष्ट्रवादीकडून खेळत होते.

ओपनिंगला उतरलेले धनंजय मुंडे संपूर्ण 12 षटकं मैदानात होते. यावेळी त्यांनी नाबाद 30 धावांची खेळी केली.

धनंजय मुंडेचा खेळ पाहण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील लोकांनीही मोठी गर्दी केली होती.

व्हिडीओ :

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Dhananjay Munde’s not out inning in Sarpanch Trophy
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV