तिहेरी तलाक देणारच, व्हॉट्सअॅपवरुन तलाक प्रकरणी प्राध्यापक ठाम

प्राध्यापक खालिद बिन युसुफ खान हे अलिगड मुस्लिम विद्यापीठात संस्कृत विभागाचे प्रमुख आहेत.

By: | Last Updated: > Tuesday, 14 November 2017 8:11 AM
Divorced on WhatsApp : AMU professor Khalid firm on giving triple talaq to wife latest update

लखनौ : उत्तर प्रदेशच्या अलिगड विद्यापीठातील प्राध्यापकानं व्हॉट्सअॅपवरुन तिहेरी तलाक दिल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. प्राध्यापकाच्या पत्नीनं यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. मात्र पती तिहेरी तलाक देण्यावर ठाम आहे.

प्राध्यापक खालिद बिन युसुफ खान यांनी अद्याप तिहेरी तलाक झाला नसल्याचं सांगितलं आहे. ‘मी तिला तोंडी तलाक दिला आणि त्याबाबत पोस्ट-व्हॉट्सअॅपने पाठवलं. महिन्याभरानंतर मी तिला पुन्हा तोंडी तलाक दिला आणि एसएमएसने कळवलं. मी तिला तिसऱ्यांदा घटस्फोट दिलेला नाही. त्यामुळे ती अजूनही माझी पत्नी आहे’ असा दावा खालिद यांनी केला.

प्राध्यापक खालिद बिन युसुफ खान हे अलिगड मुस्लिम विद्यापीठात संस्कृत विभागाचे प्रमुख आहेत.

पतीने आपल्याला घराबाहेर काढलं, मात्र पोलिसांच्या मदतीने आपण शुक्रवारी घरात शिरकाव केला, असं पत्नी यास्मिन खालिद यांनी सांगितलं. आपल्याला न्याय न मिळाल्यास मुलांसह आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. खालिद यांच्या लग्नाला 27 वर्ष झाली आहेत.

‘माझी पत्नीच मला गेल्या 20 वर्षांपासून त्रास देत आहे. आमच्या लग्नाआधीपासून तिने काही गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. तिने केलेल्या दाव्याप्रमाणे ती पदवीधरही नाही. मी ठरलेल्या दिवशी तिला तिसरा तलाक देणारच. मला कोणीही थांबवू शकत नाही. ती काय करेल, याची मला पर्वा नाही’

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीवर बंदी घातली आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅपपवरुन तलाक दिल्याचं  प्रकरण उजेडात आल्यानं या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Divorced on WhatsApp : AMU professor Khalid firm on giving triple talaq to wife latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नोटांवर लिहिलेलं असेल तरीही स्वीकारा : आरबीआय
नोटांवर लिहिलेलं असेल तरीही स्वीकारा : आरबीआय

  मुंबई : तुमच्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर जर काही लिहिलं

केवळ 312 रुपयात विमान प्रवास, GoAir ची ऑफर
केवळ 312 रुपयात विमान प्रवास, GoAir ची ऑफर

नवी दिल्ली : तुम्हाला विमान प्रवास करायचा असेल तर ही चांगली संधी ठरु

कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला
कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

बेळगाव : कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय यांच्यावर मधमाशांनी हल्ला

दिल्लीत दररोज 11 महिलांचं अपहरण, दोन मुलांचं लैंगिक शोषण
दिल्लीत दररोज 11 महिलांचं अपहरण, दोन मुलांचं लैंगिक शोषण

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिलांच्या असुरक्षितेतचं धक्कादायक

अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभं राहणार : सरसंघचालक
अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभं राहणार : सरसंघचालक

बंगळुरु : अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराशिवाय दुसरी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला अखेर मुहूर्त सापडला!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला अखेर मुहूर्त सापडला!

नवी दिल्ली : गुजरात निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या संसदेच्या

वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 3 मृत्यूमुखी
वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 3 मृत्यूमुखी

चित्रकूट (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये ‘वास्को

कलम 45 घटनाबाह्य, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी जामीन मिळणं सोपं!
कलम 45 घटनाबाह्य, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी जामीन मिळणं सोपं!

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी

गुजरात निवडणुकीत ओवेसींची एंट्री, पाटीदार आरक्षणावरुन काँग्रेसला घेरलं
गुजरात निवडणुकीत ओवेसींची एंट्री, पाटीदार आरक्षणावरुन काँग्रेसला...

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत काँग्रेसने पाटीदार समाजाला आरक्षण

तिहेरी तलाकच्या कायद्यासाठी हालचाली, राजनाथ सिंह यांची मंत्र्यांसोबत बैठक
तिहेरी तलाकच्या कायद्यासाठी हालचाली, राजनाथ सिंह यांची...

नवी दिल्ली : तिहेरी तलाकवर कायदा बनवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री