ABVP ला झटका, दिल्ली विद्यापीठाचं अध्यक्षपद NSUI कडे

तब्बल चार वर्षानंतर काँग्रेसप्रणित NSUI कडे अध्यक्षपद गेलं आहे. रॉकी तुसीद नवा अध्यक्ष असेल.

By: | Last Updated: 13 Sep 2017 06:47 PM
ABVP ला झटका, दिल्ली विद्यापीठाचं अध्यक्षपद NSUI कडे

नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत संघाशी संबंधित, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपला (ABVP)  झटका बसला आहे.  कारण तब्बल चार वर्षानंतर काँग्रेसप्रणित NSUI कडे अध्यक्षपद गेलं आहे. रॉकी तुसीद नवा अध्यक्ष असेल.

रॉकी तुसीदने ABVP च्या रजत चौधरीचा पराभव केला.

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर झाले. या निकालानंतर काँग्रेस समर्थकांनी जल्लोष केला.

कोणाकडे कोणतं पद?

  • अध्यक्ष : रॉकी तुसीद (NSUI)

  • उपाध्यक्ष : कुनाल शहरावत (NSUI)

  • सचिव: महामेधा नागर (ABVP)

  • संयुक्त सचिव: उमा शंकर (ABVP)


याशिवाय एनएसयूआयने उपाध्यक्षपदावरही कब्जा केला आहे. एनएसयूआयच्या कुणआर शहरावतने एबीव्हीपीच्या पार्थ राणाचा पराभव केला.

NSUI च्या विजयानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करुन अभिनंदन केलं. निरुपम म्हणाले, “राष्ट्रवादाच्या नावे गुंडगिरी करणाऱ्यांना नाकारण्यात आलं आहे”

https://twitter.com/sanjaynirupam/status/907883440850182144

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV