2004 ते 2016, यापूर्वी चुकीचे ठरलेले एक्झिट पोल

निकालापूर्वी समोर आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी हा अंदाज नाकारला आहे.

2004 ते 2016, यापूर्वी चुकीचे ठरलेले एक्झिट पोल

नवी दिल्ली : गुजरातमध्ये सत्ता कुणाची याचा निर्णय 18 डिसेंबरला होणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी हा अंदाज नाकारला आहे.

गुजरात निवडणुकीत काँग्रेसचं समर्थन करणारा पाटीदार नेता हार्दिक पटेलनेही एक्झिट पोलवर अविश्वास दाखवला आहे. शिवाय भाजप ईव्हीएममध्ये छेडछाड करणार असल्याचा आरोप केला आहे.

यापूर्वीचे एक्झिट पोल

  • 2004 च्या लोकसभा निवडणुकीत अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होत असल्याचं दिसत होतं, मात्र अंतिम निकाल वेगळाच लागला

  • 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा कमी होत असल्याचं दिसत होतं, मात्र प्रत्यक्षात बहुमताने काँग्रेसने सत्ता स्थापन केली

  • 2007 सालच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावती यांचा विजय एकाही एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आला नव्हता, मात्र बसपाची सत्ता आली

  • 2015 मध्ये आपच्या एकतर्फी विजयाचा अंदाज एकाही एक्झिट पोलमध्ये दिसला नव्हता

  • 2016 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमके आणि काँग्रेस युतीला आघाडी दाखवली होती, मात्र एआयएडीएमके पक्ष सत्तेत आला.


याच सर्व एक्झिट पोलच्या आकड्यांचा दाखला देत काँग्रेसने गुजरातच्या एक्झिट पोलला नाकारलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी सर्वांनाच 18 डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: exit polls which results had wrong
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV