देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना : अन्सारी

देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे.

By: | Last Updated: > Thursday, 10 August 2017 3:59 PM
Feeling of unease among Muslims, say Hamid Ansari

नवी दिल्ली : देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, असं विधान देशाचे मावळते उपराष्ट्रपदी हमीद अन्सारी यांनी केलं आहे. राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अन्सारी यांनी वक्तव्य केल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. कार्यकाळ संपत असताना हमीद अन्सारी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हमीद अन्सारी यांनी राज्यसभा टीव्हीला दिलेल्या अखेरच्या मुलाखतीत अशी टिप्पणी केली आहे, ज्यामुळे त्यांनी मोदी सरकारला आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

“देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृती अतिशय चिंताजनक आहे, असं अन्सारी म्हणाले.

पीटीआयनुसार, उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, कथित घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेकी, अंधश्रद्धेचा विरोध करणाऱ्यांची हत्या या घटना भारतीय मूल्यांना, संस्कृतीला मारक ठरत आहेत. आपल्याच नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकाऱ्यांची क्षमताही वेगवेगळ्या स्तरावर कमी पडत आहे.

देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या इतर मंत्र्यांसमोरही मांडल्याचं हमीद अन्सारी यांनी मुलाखतीत सांगितलं.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Feeling of unease among Muslims, say Hamid Ansari
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राणेंनी ज्यांना ‘दुर्योधन’ म्हटलं, त्या मोहन प्रकाश यांचं राणेंना उत्तर
राणेंनी ज्यांना ‘दुर्योधन’ म्हटलं, त्या मोहन प्रकाश यांचं राणेंना...

नवी दिल्ली : काँग्रेस सोडताना नारायण राणे यांनी ज्यांचा उल्लेख

धूम्रपानाला विरोध करणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या
धूम्रपानाला विरोध करणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणाला रोखणाऱ्या

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगी आदित्यनाथांचे 9 दिवस उपवास
नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगी आदित्यनाथांचे 9 दिवस उपवास

नवी दिल्ली : नवरात्रौत्सवाला आजपासून (गुरुवार) सुरुवात झाली आहे.

आपल्या मराठी गुरुबद्दल काय बोलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आपल्या मराठी गुरुबद्दल काय बोलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर ज्या व्यक्तीचा

गोव्यातील धरणे फुल्ल, पावसाची बॅटिंग सुरुच
गोव्यातील धरणे फुल्ल, पावसाची बॅटिंग सुरुच

गोवा : गेल्या पाच दिवसांपासून पावसाने सुरु केलेले धूमशान काही

‘त्या’ जैन दाम्पत्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
‘त्या’ जैन दाम्पत्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

नीमच : कोट्यवधीच्या संपत्तीसह तीन वर्षांच्या मुलीचा त्याग करुन

योगी सरकारकडून सहा महिन्यांचं रिपोर्ट कार्ड सादर
योगी सरकारकडून सहा महिन्यांचं रिपोर्ट कार्ड सादर

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या

एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची हत्या?
एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची हत्या?

हैदराबाद : एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची पती

साडी वाटताना राडा, डिझाईन न आवडल्याने महिला आपसात भिडल्या
साडी वाटताना राडा, डिझाईन न आवडल्याने महिला आपसात भिडल्या

हैदराबाद : साडी म्हणजे तमाम महिलावर्गाचा वीकपॉईन्ट. साडी खरेदीच