आधार डेटा विकल्याची बातमी, वृत्तपत्र आणि रिपोर्टरवर गुन्हा

दिल्लीच्या पोलीस सहआयुक्तांनी 'इंडियन एक्स्प्रेस'च्या एफआयआर दाखल झाल्याच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आधार डेटा विकल्याची बातमी, वृत्तपत्र आणि रिपोर्टरवर गुन्हा

नवी दिल्ली : आधार प्राधिकरण म्हणजे UIDAI ने ‘दी ट्रिब्यून’ हे वृत्तपत्र आणि त्यांच्या रिपोर्टरवर गुन्हा दाखल केला आहे. पैसे घेऊन आधार कार्डचा डेटा विकला जात असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. त्याची गंभीर दखल घेता हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आफआयआरमध्ये रिपोर्टर रचना खैरा आणि त्यांनी ज्या लोकांशी संपर्क केला त्यांचंही नाव आहे. दिल्लीच्या पोलीस सहआयुक्तांनी 'इंडियन एक्स्प्रेस'च्या एफआयआर दाखल झाल्याच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

केवळ 500 रुपये मोजल्यास कोणाच्याही आधार क्रमांकावरील गोपनीय माहिती मिळते, असं वृत्त रचना यांनी दिलं होतं. त्याचबरोबर अधिकचे 300 रुपये दिल्यास आधार कार्ड प्रिंटिंगचे सॉफ्टवेअरही मिळतात, असं या बातमीत म्हटलं होतं.

या वृत्तामुळे देशभरात खळबळ माजली होती. त्यानंतर आधार प्राधिकरणाने तातडीने निवेदन प्रसिद्ध करत हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर यासंदर्भातील बातमीप्रकरणी रचना खैरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बायोमेट्रिक डेटा मिळवणं कुणासाठीही शक्य नाही, असं आधार प्राधिकरणाने म्हटलं होतं. याबाबत एक पत्रही ट्रिब्युनला पाठवण्यात आलं. रिपोर्टरने कुणाच्या बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे रेकॉर्ड पाहिले का? रिपोर्टरने किती आधार क्रमांकाची पडताळणी केली आणि ते आधार नंबर कुणाचे होते? असा सवाल आधार प्राधिकरणाने ट्रिब्युनला विचारला आहे.

8 जानेवारीपर्यंत या प्रश्नांची उत्तरं न दिल्यास हे वृत्त निराधार होतं, असं ग्रहित धरण्यात येईल, असं आधार प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: FIR lodged against reporter and news paper who claimed aadhar deta leak news
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: aadhar deta आधार डेटा
First Published:

Related Stories

LiveTV