20 गर्लफ्रेण्ड्ससाठी रिअॅलिटी शो डान्सर झाला चोर

अदनान खान हा द्वारकामध्ये डॉमिनोज् पिझा आऊटलेटमध्ये साडेतीन लाखांची लूट करणाऱ्या गँगचा सदस्य आहे.

20 गर्लफ्रेण्ड्ससाठी रिअॅलिटी शो डान्सर झाला चोर

नवी दिल्ली : अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकलेल्या डान्सरला दिल्ली पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केली आहे. चित्रपटात काम करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि 20 गर्लफ्रेण्ड्सना खुश ठेवण्यासाठी अदनान खानने चोऱ्या केल्याचा आरोप आहे.

अदनान हा द्वारकामध्ये डॉमिनोज् पिझा आऊटलेटमध्ये साडेतीन लाखांची लूट करणाऱ्या गँगचा सदस्य आहे. अदनाने दहावीतच शाळा सोडली होती. त्यानंतर त्याने नृत्याचे क्लास घ्यायला सुरुवात केली. आपलं कौशल्य दाखवण्यासाठी त्याने यूट्यूब चॅनलही सुरु केलं. त्यानंतर तो डान्स इंडिया डान्स, झलक दिखला जा, नच बलिए यासारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता.

इतकंच नाही, तर अदनान 2014 मधील 'मिस्टर उत्तराखंड' या स्पर्धेचा विजेताही ठरला होता. नाव कमवल्यामुळे मुलींमध्ये त्याचा बोलबाला होता. पैसे कमवण्यासाठी अदनाने दिल्लीचे क्लब्ज आणि रेस्तराँमध्ये डान्स करायला सुरुवात केली, मात्र यातून त्याला मनाजोगती कमाई झाली नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

राम नावाच्या एका व्यक्तीने अदनानला गुन्हेगारी जगताशी ओळख करुन दिली. आपल्या टोळीत सहभागी झाल्यास पुरेसा पैसा मिळवण्याचं आश्वासन रामने अदनानला दिलं. पैशाची गरज असल्यामुळे अदनानने होकार दिला. द्वारकामधील सेक्टर 12 मध्ये असलेल्या डॉमिनोज् पिझाच्या आऊटलेटमध्ये चोरी करण्यास अदनान तयार झाला.

चोरीनंतर काही दिवसातच रामला अटक झाली. हे समजताच अदनानने घरातून पळ काढला आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो लपून राहिला. अटक टाळण्यासाठी तो आपले मोबाईल नंबरही बदलत राहिला. अखेर 22 जानेवारीला एका बस स्टँडवर पोलिसांनी त्याला गाठलं आणि बेड्या ठोकल्या.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Former Dance reality show participant turns robber to spend on 20 girlfriends latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV