वीरपुत्र शहीद प्रफुल्ल मोहरकर अनंतात विलीन

भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय इतमामात अखेरची सलामी दिली.

वीरपुत्र शहीद प्रफुल्ल मोहरकर अनंतात विलीन

भंडारा : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या वीरपुत्राला रात्री अखेरची सलामी देण्यात आली. शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून जनसागर लोटला होता. भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय इतमामात अखेरची सलामी दिली.

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यात भारताचे चार जवान शहीद झाले असून शहीदांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश आहे. दुर्देव म्हणजे शहीद मोहरकर यांच्या लग्नाचा काल चौथा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडिल असा परिवार आहे.

शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचा अल्पपरिचय

मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे 36 वर्षांचे होते. ते मूळचे भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील पवनी शहरातील. बारावीनंतर त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. मात्र देशसेवेचा ध्यास मनाशी बाळगलेल्या प्रफुल्ल यांनी NDA मध्ये प्रवेश मिळवला.

आठ वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. पदोन्नती होऊन प्रफुल्ल मोहरकर मेजर पदावर पोहोचले.

चार वर्षांपूर्वी प्रफुल्ल यांचं अवोली यांच्याशी लग्न झालं होतं. प्रफुल्ल यांचे वडील अंबादास मोहरकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत, आई शिक्षिका आहे. लहान भाऊ परेश हा पुण्यात नोकरी करतो.

जुनोना या गावात प्रफुल्ल यांचं प्राथमिक शिक्षण, तर माध्यमिक आणि त्यापुढील सर्व शिक्षण बाहेर झालं.

मरण प्रत्येकालाच येतं, मात्र देशासाठी दर जीव गेला तर अभिमानच वाटेल, असं कायम सांगणाऱ्या प्रफुल्ल मोहरकर हे देशासाठी लढता लढता शहीद झाले.

संबंधित बातमी : लग्नाच्या वाढदिनी महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Funeral on martyr Praful Moharkar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV