राजस्थान विधानसभेत भूताची अफवा, आमदारांचं मुख्यमंत्र्यांना साकडं

काही आमदारांनी थेट मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. यज्ञ करुन भूतबाधा दूर करावी, असं साकडं यावेळी भाजप आमदारांनी घातलं.

राजस्थान विधानसभेत भूताची अफवा, आमदारांचं मुख्यमंत्र्यांना साकडं

जयपूर : राजस्थानच्या विधानसभेत भूत असल्याच्या अफवांना ऊत आला आहे. सभागृहात 200 सदस्यांची संख्या फार काळ टिकत नसल्यामुळे या अफवांचं पेव फुटलं आहे.

कुठला आमदार तुरुंगात जातो, कधी कुणी राजीनामा देतं. सहा महिन्यांच्या कालावधीत दोन आमदारांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही आमदारांना अस्वस्थ वाटायला लागलं. आत्मा असल्यामुळे हे घडत असल्याचा गैरसमज आमदारांनी करुन घेतला आहे.

काही आमदारांनी थेट मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. यज्ञ करुन भूतबाधा दूर करावी, असं साकडं यावेळी भाजप आमदारांनी घातलं.

स्मशानभूमीच्या जागेवर विधानसभेची वास्तू उभारली आहे. त्यामुळे वाईट शक्तींचा वावर इथे आहे, म्हणून हे प्रकार घडत असल्याचा अंदाज आमदारांनी व्यक्त केला आहे.

नाथद्वाराचे आमदार कल्याण सिंह यांचा उदयपूरमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर मंडलगडच्या आमदार कीर्ती कुमारी यांचं ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्लूने निधन झालं होतं. दोन्ही सत्ताधारी भाजपचे आमदार होते.

ज्योतीनगरमध्ये 16.96 एकरांवर पसरलेली राजस्थान विधानसभेची वास्तू ही देशातील आधुनिक विधीमंडळ इमारतींपैकी एक आहे. लाल कोठी स्मशानभूमी ही या इमारतीच्या जवळच आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ghost feared in Rajasthan Vidhan Sabha, MLAs asked CM Vasundhara Raje to perform Yajna latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV