गोव्यात समुद्रात अडकलेल्या जहाजातून चौघांची थरारक सुटका

गोव्यातल्या कसिनो शिपवरुन चौघा जणांची सुटका करण्यात आली. समुद्रात अडकलेल्या एम व्ही लकी सेव्हन या जहाजावरुन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने चौघांना वाचवण्यात आलं.

गोव्यात समुद्रात अडकलेल्या जहाजातून चौघांची थरारक सुटका

पणजी : गोव्यातल्या कसिनो शिपवरुन चौघा जणांची सुटका करण्यात आली. समुद्रात अडकलेल्या एम व्ही लकी सेव्हन या जहाजावरुन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने चौघांना वाचवण्यात आलं.

पणजीजवळ मीरामार बीचवर एम व्ही लकी सेव्हन हे जहाज समुद्रात अडकलं होतं. त्यावरील चार कर्मचाऱ्यांना अचानक त्रास सुरु झाला. त्यापैकी एकाचा हात मोडला होता, तर तिघांना उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला.

पणजीहून निघालेल्या कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टनं या चौघांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यांना मीरामारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV