'गांधी' आडनावामुळेच दोनवेळा खासदार झालो : वरुण गांधी

‘गांधी’ आडनावामुळेच कमी वयात दोनवेळा लोकसभा खासदार बनण्यास मदत झाल्याचं वक्तव्य भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केलं. तसंच गॉडफादरशिवाय राजकारणात पाय रोवणं कठीण असल्याचंही वरुण गांधी म्हणाले.

'गांधी' आडनावामुळेच दोनवेळा खासदार झालो : वरुण गांधी

हैदराबाद : ‘गांधी’ आडनावामुळेच कमी वयात दोनवेळा लोकसभा खासदार बनण्यास मदत झाल्याचं वक्तव्य भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केलं.  तसंच गॉडफादरशिवाय राजकारणात पाय रोवणं कठीण असल्याचंही वरुण गांधी म्हणाले.

वरुण गांधी उत्तरप्रदेशमधील सुलतानपूरमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते भाजपचे खासदार आहेत. हैदराबादेतील एका कार्यशाळेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मी आज हैदराबादमध्ये आलो आणि तुम्ही मला ऐकता आहात. मात्र जर माझ्या नावापुढे गांधी आडनाव नसतं आणि मी दोनवेळा खासदार नसतो तर तुम्ही मला ऐकायला आला नसता, असंही वरुण गांधी पुढे म्हणाले.

दरम्यान आज तरुणांना राजकारणात यायचं आहे, पण गॉडफादर नसल्यामुळे ते राजकारणापासून दूर राहात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: godfather is must to enter in politics gandhi surname helped me to become mp says varun gandhi latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV