ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ

सोन्याच्या दरात गेल्या चार दिवसांपासून सलग वाढ होत आहे. आज (बुधवार) सोन्याचे दर तब्बल 32,000 रुपयांच्याही पुढे पोहचले आहेत.

ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ

 

मुंबई : सोन्याच्या दरात गेल्या चार दिवसांपासून सलग वाढ होत आहे. आज (बुधवार) सोन्याचे दर तब्बल 32,000 रुपयांच्याही पुढे पोहचले आहेत. मुंबईत आज सोन्याचा दर (24 कॅरेट) दहा ग्रामसाठी 32,171 रुपये एवढा आहे.

परदेशी बाजारात डॉलर कमजोर झाल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच स्थानिक सराफांकडूनही सोन्याची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.

गेले अनेक दिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने मध्यमवर्गींयांमध्ये मात्र याबाबत बरीच नाराजी आहे. त्यामुळे सोनं खरेदीस मध्यमवर्गींयांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येत आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: gold prices Increase for four consecutive days latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV