सोन्याच्या दरात मोठी उसळी, या वर्षातली सर्वात उच्चांकी वाढ

सोनं तब्बल 31 हजार 350 रुपयांवर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे 10 महिन्यातील ही सर्वात उच्चांकी वाढ आहे.

सोन्याच्या दरात मोठी उसळी, या वर्षातली सर्वात उच्चांकी वाढ

मुंबई : सोन्याच्या दरात या वर्षातली सर्वात मोठी 990 रुपयांची वाढ झाली आहे. सोनं तब्बल 31 हजार 350 रुपयांवर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे 10 महिन्यातील ही सर्वात उच्चांकी वाढ आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये सोन्याचे दर 31 हजार 200 रुपयांवर पोहोचले होते.

सोन्याच्या दरवाढीमागे उत्तर कोरियाची बॉम्ब चाचणी हे कारण आहेच. परंतु आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत आणि दक्षिण कोरियामध्ये झालेला करार. या करारानुसार, भारताने कोरियातून सोन्याची नाणी आयात केली तर त्यावर इम्पोर्ट ड्यूटी लागत नाही. मागील दोन महिन्यात दहा टन नाणी आयात झाली आहेत. शिवाय त्यावर जीएसटीही लागत नव्हता. त्यामुळे सोन्याचा दर कमी होता.

व्यापाऱ्यांनी हे सोनं बाजारात आणून ते वितळवलं. परंतु सरकारला अपेक्षित महसूल मिळाला नाही. तसंच दीड महिन्यानंतर ही आयात बंद झाल्याने सोन्याचे दर वधारले आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: gold rates दर सोनं
First Published:
LiveTV