भाजप खासदाराची जीभ घसरली, राहुल गांधींची कुत्र्याशी तुलना

पीएनबी घोटाळ्यावर राहुल गांधींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ब्रिजभूषण सिंह यांची जीभ घसरली.

भाजप खासदाराची जीभ घसरली, राहुल गांधींची कुत्र्याशी तुलना

लखनौ : राजकारणातील टीकेचा दर्जा किती घसरलाय, याचं उदाहरण उत्तरप्रदेशमध्ये पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशमधील केसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना कुत्र्याशी केली. पीएनबी घोटाळ्यावर राहुल गांधींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ब्रिजभूषण सिंह यांची जीभ घसरली.

"राहुल को बोलने का अधिकार नहीं है. कुत्ते भौंकते रहते हैं और हाथी मस्त चाल में चलता है," असं वक्तव्य ब्रिजभूषण यांनी केलं. पीएनबी घोटाळ्यावरुन देशातलं राजकारण तापलेलं असतानाच भाजप खासदाराने हे वक्तव्य केलं.

पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदीच्या घोटाळ्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी काव्यात्मक ट्वीट करत मोदींवर टीका केली होती. हा घोटाळा समोर येऊन आठवडा होत आलेला असतानाही मोदींनी यावरचं मौन सोडलेलं नाही. त्यामुळे राहुल गांधींनी टीका केली होती.

पहले ललित फिर माल्या

अब नीरव भी हुआ फरार

कहाँ है 'न खाऊँगा, न खाने दूँगा' कहने वाला देश का चौकीदार?

साहेब की खामोशी का राज़ जानने को जनता बेकरार

उनकी चुप्पी चीख चीख कर बताए

वो किसके हैं वफादारसंबंधित बातम्या :

पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी

PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक

PNB घोटाळा : 5 हजार कोटींचा गैरव्यवहार एनडीएच्या काळात

PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द

पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार?

PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?

PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले

पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: gonda bjp mp calls congress president rahul gandhi a dog
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV