मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलचा सलाम

रखमाबाईंनी सुमारे 35 वर्षे यशस्वीरित्या वैद्यकीय सेवा दिली. त्याचसोबत, बालविवाहाच्या प्रथेविरोधात आणि महिलांच्या एकांतवासासंदर्भात लेखनही केले.

मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलचा सलाम

मुंबई : डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटना इत्यादींची आठवण करुन देणाऱ्या गूगलने आज अशा व्यक्तीचं डूडल तयार केलं आहे, ज्या व्यक्तीने भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे. ती व्यक्ती म्हणजे, डॉ. रखमाबाई राऊत.

मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. ज्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते, अशा काळात रखमाबाई राऊत यांनी परिस्थितींवर मात करुन यशाचं शिखर गाठलं.

रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. रखमाबाई यांच्या आईचा बालविवाह झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी रखमाबाईंच्या आईचं म्हणजे जयंतीबाईंचं लग्न झालं होतं, 15 व्या वर्षी रखमाबाईंच्या रुपाने मुलगी झाली आणि 17 व्या वर्षी त्यांचा पती म्हणजे रखाबाईंच्या वडिलांचे निधन झाले. अवघ्या 17 व्या वर्षी जयंतीबाई विधवा झाल्या आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. पुढे जयंतीबाईंनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरं लग्न केलं.

Rakhmabai Raut

आईप्रमाणेच रखमाबाई यांचाही बालविवाह झाला. रखमाबाईंचा वयाच्या 11 व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी विवाह झाला. मात्र त्यांनी माहेरी राहून वैद्यकीय शिक्षण घेतलं.

मार्च 1884 मध्ये दादाजी यांनी मुंबई हायकोर्टात वैवाहिक हक्कासाठी याचिका दाखल केली आणि रखमाबाईंनी त्यांच्यासोबत राहावं म्हणून मागणी केली. त्यावेळी, दादाजी यांच्यासोबत राहा किंवा तुरुंगात जा, असे कोर्टाने सांगितले. अर्थात, रखमाबाईंनी तो निर्णय नाकारला आणि न्यायालयीन लढाई दिली.

पुढे हाच खटला लँडमार्क ठरला आणि 1891 मध्ये एज ऑफ कॉन्सेन्ट अॅक्ट अस्तित्त्वात आला.

रखमाबाईंनी सुमारे 35 वर्षे यशस्वीरित्या वैद्यकीय सेवा दिली. त्याचसोबत, बालविवाहाच्या प्रथेविरोधात आणि महिलांच्या एकांतवासासंदर्भात लेखनही केले.

वयाच्या 91 व्या वर्षी रखमाई राऊत यांचं निधन झालं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Google Doodle on Rukhmabai Raut’s Birth Anniversary latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV