'गोरखपूरमधल्या 36 मुलांच्या मृत्यूप्रकरणी कडक कारवाई करणार'

गोरखपूरमधील 36 मुलांच्या मृत्यूप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं. योगी आदित्यनाथ यांनी आज रुग्णालयाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा हे देखील उपस्थित होते. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

By: | Last Updated: > Sunday, 13 August 2017 3:19 PM
gorakhpur tragedy cm yogi adityanath press conference latest update

गोरखपूर : गोरखपूरमधील 36 मुलांच्या मृत्यूप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं. योगी आदित्यनाथ यांनी आज रुग्णालयाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा हे देखील उपस्थित होते. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, ”या घटनेची चौकशीचे आदेश दिले असून, चौकशी अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणाची पंतप्रधान मोदींनीही गंभीर दखल घेतली असून, पंतप्रधानांकडून मदतीचं आश्वासन मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री यावेळी प्रचंड भावूक झाले होते.

माध्यमांतून होणाऱ्या रिपोर्टिंग बाबतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, ”माध्यमांनी या प्रकरणातील चुकीच्या माहितीवर नाही, तर वास्तविक रिपोर्टिंग केलं पाहिजे. यासाठी माध्यम प्रतिनिधींनी स्वत:  रुग्णालयात जाऊन पाहाणी करावी. तिथं मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच माध्यमांनी रिपोर्टिंग करावं. त्यासाठी माध्यम प्रतिनिधींना सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आदेश, रुग्णालय प्रशासनला दिले आहेत,” असं त्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ”Encephalitis (मेंदूचा ताप) विरोधात 1996  पासून मी लढा देत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी संसदेत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या आजाराविरोधात सर्वांनी एकजूट होऊन लढण्याची गरज आहे”

दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी राजीव राउतेला यांनी आपल्या अहवालात धक्कादायक खुलासा केला आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाल्यानेच मुलांचा मृत्यू झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नमुद केलं आहे.

दुसरीकडे मुलांच्या मृत्यूसाठी ऑक्सिजनची कमतरता कारण नसल्याचा, दावा उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी शनिवारी केला. तसेच गेल्या काही वर्षांमधील ऑगस्ट महिन्यातील मुलांच्या मृत्यूची आकडेवारीही त्यांनी काल सादर केली.

संबंधित बातम्या

‘गोरखपूरमधील 36 मुलांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाही’

गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा मृत्यू

गोरखपूर: रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानं 30 मुलांचा मृत्यू

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:gorakhpur tragedy cm yogi adityanath press conference latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राजधानी एक्स्प्रेसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा
राजधानी एक्स्प्रेसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा

नवी दिल्ली : सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राजधानी

'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अयुब लेलहारीला कंठस्नान
'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अयुब लेलहारीला कंठस्नान

नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी

हिजबुल मुजाहिद्दीन अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित
हिजबुल मुजाहिद्दीन अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित

नवी दिल्ली : काश्मिर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिजबुल

5 रुपयात नाश्ता, 10 रुपयात जेवण.. बंगळुरुत ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरु
5 रुपयात नाश्ता, 10 रुपयात जेवण.. बंगळुरुत ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरु

बंगळुरु : कामगार आणि गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी बंगळुरूत

स्वातंत्र्यदिनाचं माझं भाषण प्रसारित केलं नाही, त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप
स्वातंत्र्यदिनाचं माझं भाषण प्रसारित केलं नाही, त्रिपुराच्या...

अगरताळा : स्वातंत्र्यदिनानिमित्तानं केलेलं भाषण दूरदर्शन आणि

मित्रांची बाईक रेस, हेल्मेटला कॅमेरा, भिंतीला धडकून जीव गेला!
मित्रांची बाईक रेस, हेल्मेटला कॅमेरा, भिंतीला धडकून जीव गेला!

नवी दिल्ली: दिल्लीत मित्रांसोबत लावलेली बाईक रेस एका तरुणाच्या आणि

'लव्ह जिहाद' प्रकरणाचा तपास NIA ने करावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
'लव्ह जिहाद' प्रकरणाचा तपास NIA ने करावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने केरळमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाचा

'रोहित वेमुला दलित नव्हता, नैराश्येतून त्याची आत्महत्या'
'रोहित वेमुला दलित नव्हता, नैराश्येतून त्याची आत्महत्या'

नवी दिल्ली: हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला दलित

श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे
श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात एका महिलेने ‘भारत माता की

बिहारमध्ये पुराचं थैमान, 56 जणांचा मृत्यू, 70 लाख नागरिकांना फटका
बिहारमध्ये पुराचं थैमान, 56 जणांचा मृत्यू, 70 लाख नागरिकांना फटका

पाटणा: बिहारमध्ये आलेल्या महापुराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला