गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा मृत्यू

ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळं 36 बालकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना, उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये घडली आहे.

By: | Last Updated: > Saturday, 12 August 2017 11:30 AM
Gorakhpur Tragedy:36 children dead due to Oxygen Supply cut off, in BRD hospital Uttar pradesh

लखनऊ: ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळं 36 बालकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना, उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये घडली आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये हा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे 9 ऑगस्टलाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीआरडी मेडिकल कॉलेजचा पाहणी दौरा केला होता.

बिल थकवल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा बंद

66 लाखांचं बील थकवण्यात आल्यानं ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या फर्मनं काल रात्रीपासूनच हा ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला होता. लिक्विड ऑक्सिजन देखील गुरुवारपासून बंद होते. त्यात आज सगळे सिलेंडरही संपले. एनएनयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 तर इन्सेफेलाइट्स वॉर्डमधील 12 बालकांचा मृत्यू झाला. दरम्यान यानंतरही रुग्णालय ऑक्सिजनची तरतूद न करू शकल्यानं मृतांचा आकडा 36 वर पोहोचला.

निष्काळजीपणामुळे 36 मुलांचा बळी

मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचं नाव पुष्पा अॅण्ड सन्स असल्याचं समजतं आहे. अनेक रिपोर्टनुसार, मेडिकल कॉलेजमध्ये सेंट्रल पाइपलाईननं लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. पण गुरुवारी अचानक हा पुरवठा थांबवण्यात आला.

रुग्णालयातील आयसीयू आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये काल रात्री 11.30 वा. ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आला. जो शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत कायम होता. हा पुरवठा थांबला असल्याचं माहित असूनही ऑक्सिजनची दुसरी कोणतीही व्यवस्था केली नाही. यामुळे रुग्णालयातील 36 मुलांचा हकनाक बळी गेला.

दरम्यान, 9 ऑगस्टलाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या रुग्णालयाची पाहणीही केली होती. याबाबतचं ट्वीट देखील त्यांनी केलं होतं.

देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय.

36 मुलांचा हकनाक बळी घेणाऱ्या  कंपनी आणि रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Gorakhpur Tragedy:36 children dead due to Oxygen Supply cut off, in BRD hospital Uttar pradesh
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पंजाबमध्ये ज्येष्ठ पत्रकार केजे सिंह यांची गळा चिरुन हत्या
पंजाबमध्ये ज्येष्ठ पत्रकार केजे सिंह यांची गळा चिरुन हत्या

मोहाली : बंगळुरुत ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची

शौचालयासाठी पंतप्रधान मोदींनी स्वत: विटा रचल्या
शौचालयासाठी पंतप्रधान मोदींनी स्वत: विटा रचल्या

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या वाराणसी दौऱ्यातील

प्रद्युम्न हत्याकांड : चौकशीसाठी तीनजण सीबीआयच्या ताब्यात
प्रद्युम्न हत्याकांड : चौकशीसाठी तीनजण सीबीआयच्या ताब्यात

नवी दिल्ली : प्रदुम्न हत्याकांडाच्या चौकशीसाठी पोलिसांनी अटक

‘त्या’ सहा बँकांच्या कार्ड वापरास बंदी संदर्भातील वृत्ताचं IRCTC कडून खंडन
‘त्या’ सहा बँकांच्या कार्ड वापरास बंदी संदर्भातील वृत्ताचं IRCTC कडून...

नवी दिल्ली : इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिझम कॉरपोरेशन (IRCTC) ने SBI

हे काम देवच करु शकतो, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला पिटाळलं
हे काम देवच करु शकतो, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला पिटाळलं

नवी दिल्ली : काही गोष्टी सुप्रीम कोर्टही करु शकत नाही, त्या फक्त

VIDEO : पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण, महिला न्यायाधीश निलंबित
VIDEO : पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण, महिला न्यायाधीश निलंबित

अलाहाबाद : महिला न्यायाधीशाने पोलिस कॉन्स्टेबलच्या कानशिलात

‘महात्मा गांधी, नेहरु, बाबासाहेब आंबेडकर हे सर्व अनिवासी भारतीय’
‘महात्मा गांधी, नेहरु, बाबासाहेब आंबेडकर हे सर्व अनिवासी भारतीय’

न्यूयॉर्क : महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, मौलाना आझाद,

हनीप्रीत आणि राम रहीमचे अनैतिक संबंध, हनीप्रीतच्या पतीचा आरोप
हनीप्रीत आणि राम रहीमचे अनैतिक संबंध, हनीप्रीतच्या पतीचा आरोप

नवी दिल्ली : बलात्काराच्या आरोपाखाली बाबा राम रहीमला राम रहीमला अटक

नराधम मामा... बहिणीच्या तीन वर्षीय मुलीची अत्याचार करुन हत्या
नराधम मामा... बहिणीच्या तीन वर्षीय मुलीची अत्याचार करुन हत्या

बेळगाव : बहिणीच्या तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या

रेल्वे बुकिंगसाठी SBI आणि ICICI सह 6 बँकांचं कार्ड वापरण्यास बंदी
रेल्वे बुकिंगसाठी SBI आणि ICICI सह 6 बँकांचं कार्ड वापरण्यास बंदी

नवी दिल्ली : आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकीट बुक करत करणाऱ्या