अल्प बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात

अल्प बचत योजनांवरील व्याजदारात अर्थ मंत्रालयाने जरी कपात केली असली, तरीही बँकांच्या तुलनेत या अल्प बचत योजनांवरील व्याजदर अधिकच आहेत.

अल्प बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीसह अन्य छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेत, केंद्र सरकारने छोट्या गुंतवणुकदारांना मोठा झटका दिला आहे. यात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्या योजना, किसान विकास पत्र आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या योजनांचा समावेश आहे.

एक जानेवारी ते 31 मार्च दरम्यान या योजनांमधील व्याजदरात कपात केली जाणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांमधील व्याजदरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तसेच सेव्हिंग डिपॉझिटमध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे.

अल्प बचत योजनांवरील व्याजदारात अर्थ मंत्रालयाने जरी कपात केली असली, तरीही बँकांच्या तुलनेत या अल्प बचत योजनांवरील व्याजदर अधिकच आहेत.

अनेक बँकांमध्ये बचत खात्यावरील व्याजदर 3.5 टक्के करण्यात आले असताना, अल्प बचत योजनांवरील व्याजदर 4 टक्के आहे.

दुसरीकडे, बँकांच्या एका वर्षाहून अधिक मर्यादेच्या बचत योजनांवरील व्याजदर 6 ते 6.75 टक्के आहेत, तर त्याचवेळी अल्पबचत योजनांवरील व्याजदर 6.6 ते 8.3 टक्क्यांच्या दरम्यान आहेत.

अल्प बचत योजनांमध्ये मुख्यत: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), पोस्टातील बचत योजना, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश होतो.

किसान विकास पत्र वगळता इतर वेगवेगळ्या योजनांचा वापर अनेकदा बचतीसोबतच कर बचतीसाठीही होता.

अल्प बचत योजना सर्वात सुरक्षित मानल्या जातात. कारण मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज यांची हमी सरकार देतं. पोस्टात या योजना उपलब्ध असतात. मात्र आता अनेक बँकांमध्येही पीपीएफ खाते उघडू शकता.

अल्प बचत योजनांवरील व्याजदर दर तीन महिन्यांनी ठरवले जाते.

सरकारने अल्प बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केली असली, तर ज्येष्ठ नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या 5 वर्षांहून अधिक मुदतीच्या जमा ठेव योजनांवरील व्याजदरात कोणतीही कपात केली नाही. ज्येष्ठ नागरिकांना यापुढेही आधीप्रमाणेच 8.3 टक्के व्याज मिळेल.

अल्प बचत योजनांवरील व्याजदरांमधील बदल असे असतील :

Tax

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Government cuts interest on small savings schemes latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV