सरकार लवकरच 100 रुपयांचं नाणं जारी करणार!

डॉ. एम. जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकार लवकरच शंभर रुपयांचं नाणं जारी करणार आहे. सोबतच पाच रुपयांचं नवं नाणंही जारी करण्यात येणार आहे.

सरकार लवकरच 100 रुपयांचं नाणं जारी करणार!

नवी दिल्ली : दोनशे रुपयांची नोट चलनात आणल्यानंतर सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच शंभर रुपयांचं नाणं जारी करणार आहे. सोबतच पाच रुपयांचं नवं नाणंही जारी करण्यात येणार आहे. डॉ. एम. जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही नाणी जारी करण्यात येतील.

शंभर रुपयांचं नाणं कसं असेल?

शंभर रुपयांचं नाणं 44 मिमी आणि 35 ग्रॅम वजनाचं असेल. नाण्याच्या वरच्या बाजूला अशोत स्तंभ असेल आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. अशोक स्तंभ, भारत आणि INDIA असं वेगवेगळ्या बाजूला लिहिलेलं असेल.

त्याखाली अंकामध्ये 100 लिहिलेलं असेल. नाण्याच्या मागील बाजूवर एम. जी. रामचंद्रन यांचा फोटो असेल. फोटोच्या खाली 1917 ते 2017 असं लिहिलेलं असेल. चार धातूंनी मिळून शंभर रुपयांचं हे नाणं तयार करण्यात येणार आहे.

पाच रुपयांचं नवं नाणं कसं असेल?

पाच रुपयांचं नवं नाणं 23 मिमी आणि 6 ग्रॅम वजनाचं असेल. नाण्याच्या वरच्या बाजूला अशोत स्तंभ असेल आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. अशोक स्तंभ, भारत आणि INDIA असं वेगवेगळ्या बाजूला लिहिलेलं असेल.

त्याखाली अंकामध्ये 5 लिहिलेलं असेल. नाण्याच्या मागील बाजूवर एम. जी. रामचंद्रन यांचा फोटो असेल. फोटोच्या खाली 1917 ते 2017 असं लिहिलेलं असेल. तीन धातूंनी मिळून शंभर रुपयांचं हे नाणं तयार करण्यात येणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: coins of 100 and 5 rupees नाणं
First Published:

Related Stories

LiveTV