एका रसगुल्ल्यावरुन भर मंडपात राडा, लग्नच मोडलं!

By: | Last Updated: > Wednesday, 19 April 2017 1:54 PM
grooms relative creates ruckus over rasgulla bride reject to marry

लखनौ: सध्या जोरदार लग्नसराई सुरु आहे. लग्न म्हटलं की, धमाल, मस्ती आणि मनसोक्त खाणंपिणं आलंच. त्यातही अनेकजण गोड पदार्थांवर जरा जास्तच तुटून पडतात. पण अशाच एका गोड पदार्थानं एका लग्नात चांगलाच घोळ घातला.

 

उत्तरप्रदेशमधील एका लग्नात फक्त एका रसगुल्ल्यावरुन बरंच महाभारत घडलं. गोड रसगुल्लामुळे नव्यानं जुळणाऱ्या नात्यामध्ये अक्षरश: कडवटपणा आणला.

 

पहिली घटना:

 

उत्तरप्रदेशमधील बदायूँमध्ये एका रसगुल्ल्यावरुन सुरु झालेला वाद अक्षरश: मारहाणीपर्यंत पोहचला. त्याचं झालं असं की, नवऱ्या मुलाकडील एका व्यक्तीनं जेवताना दोन रसगुल्ले मागितले. पण त्याला फक्त एकच रसगुल्ला दिला. यामुळे तो व्यक्ती खूपच भडकला. इथूनच खरा वाद वाढला.

 

भर मंडपात प्रचंड वाद सुरु असताना अनेक वऱ्हाडी तेथे पोहचले आणि त्यांनी थेट तिथं असणारं जेवणच फेकून दिलं. यानंतर मुलीकडच्या लोकांनी देखील तिथं धाव घेतली. त्यामुळे मंडपात बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तसंच तिथं पंचायत देखील भरवण्यात आली. प्रकरण आपसात मिटवून घ्या असं आवाहन पंचायतीच्या सदस्यांनी दोन्हीकडच्या लोकांना केलं. पण यावेळी नवऱ्या मुलीनं अतिशय कणखर भूमिका घेतली आणि थेट लग्नालाच नकार दिला.

 

दुसरी घटना:

 

दुसरीकडे एका खासगी सोहळ्यात रसगुल्ले खाल्यानं शेकडो जणांना बाधा झाली. कुशीनगरच्या चौपटिया गावात किशुन चौहानच्या घरी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं असणाऱ्या जेवण्यातील रसगुल्ल्यामुळे जवळजवळ 100 जणांना बाधा झाली.

 

दरम्यान सर्वांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असू त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

 

 

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:grooms relative creates ruckus over rasgulla bride reject to marry
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

वादग्रस्त स्वामी ओम यांना दहा लाखांचा दंड
वादग्रस्त स्वामी ओम यांना दहा लाखांचा दंड

नवी दिल्ली: सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी असणारे स्वयंभू बाबा

दोनशे रुपयांची नोट उद्या चलनात येणार
दोनशे रुपयांची नोट उद्या चलनात येणार

नवी दिल्ली: 500 आणि दोन हजारानंतर अखेर दोनशे रुपयांची नोटही बाजारात

'राईट टू प्रायव्हसी'चा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर काय फरक?
'राईट टू प्रायव्हसी'चा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर काय फरक?

मुंबई : ‘राईट टू प्रायव्हसी’ म्हणजेच व्यक्तिगत गोपनियता हा

'राईट टू प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार : सुप्रीम कोर्ट
'राईट टू प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वैयक्तिक गोपनियता अर्थात राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत

महामार्गांवरील दारुबंदी महापालिका क्षेत्रांसाठी नाही : सुप्रीम कोर्ट
महामार्गांवरील दारुबंदी महापालिका क्षेत्रांसाठी नाही : सुप्रीम...

नवी दिल्ली : महामार्गांच्या पाचशे मीटर अंतरातील दारुची दुकानं जर

राम रहीम बलात्कार निकाल: पंजाब-हरियाणात अलर्ट, 2 दिवस शाळा-कॉलेज बंद
राम रहीम बलात्कार निकाल: पंजाब-हरियाणात अलर्ट, 2 दिवस शाळा-कॉलेज बंद

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील

सरकारी बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारचं मोठं पाऊल
सरकारी बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारचं मोठं पाऊल

नवी दिल्ली : सरकारी बँकांच्या विलीनीकरणाच्या दिशेने केंद्र

भारत आणि अमेरिकेचे सैनिक संयुक्त युद्ध सराव करणार
भारत आणि अमेरिकेचे सैनिक संयुक्त युद्ध सराव करणार

नवी दिल्ली : डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण असताना

मंत्रिमंडळ फेरबदलात सुरेश प्रभूंच्या खांद्यावर पर्यावरण मंत्रालयाची धुरा?
मंत्रिमंडळ फेरबदलात सुरेश प्रभूंच्या खांद्यावर पर्यावरण...

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी राजीनामा दिला, पण

नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देणारे सुरेश प्रभू तिसरे रेल्वेमंत्री
नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देणारे सुरेश प्रभू तिसरे...

नवी दिल्ली : आठवडाभरात रेल्वेचे दोन अपघात झाल्याने, नैतिक जबाबदारी