गुजरात निवडणूक : शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

शिवसेनेच्या केवळ आठ उमेदवारांनाच एक हजार मतांचा ओलांडता आला.

गुजरात निवडणूक : शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

गांधीनगर : राज्यासह केंद्रात सत्तेत असूनही शिवसेना सातत्याने विरोधकाची भूमिका बजावत आहे. इतकंच नाहीतर गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी वाढवण्यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी 36 जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केले होते.

परंतु या निवडणुकीत शिवसेनेला जबर फटका बसला. सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे 36 उमेदवारांना मिळून जवळपास फक्त 28 हजार 660 मतं मिळाली आहेत. ही मतं एकूण मतदानाच्या 0.08 टक्के आहेत.

तर शिवसेनेच्या केवळ आठ उमेदवारांनाच एक हजार मतांचा ओलांडता आला. यापैकी लिंबायत मतदारसंघातील सम्राट पाटील यांना सर्वाधिक 4 हजार 75 मतं पडली आहेत. इथे भाजपच्या संगीता पाटील यांचा विजय झाला.

भाजपची सत्ता, पण काँग्रेसची कडवी झुंज
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली आहे. 182 पैकी भाजपला 99 तर काँग्रेसला 80 आणि इतरांना 3 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने 150 जागांचे लक्ष्य ठेवलं होतं. पण भापला हा आकडा गाठता आलेला नाही.

गुजरातमधील जनता भाजपवर नाराज
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेनेने भाजपवर निशाणा साधत, गुजरातमधील जनता भाजपवर नाराज असल्याची प्रतिक्रिया दिली. "गुजरातच्या विकास मॉडेलचा दाखला देत, भाजप देशात सत्तेत आली. पण निकालावरुन, गुजरातमधील जनता भाजपवर खुश नसेल, तर याचा अर्थ समजून घेतला पाहिजे," असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेला डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल : शेलार
तर 'भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशीन घ्यावं लागेल,' असा टोलाही आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. तसंच विजयाचं सेलिब्रेशन म्हणून भाजपने 'सामना' पथकाचं ढोल वाजवून जल्लोष केला.

शिवसेनेच्या या उमेदवारांची डिपॉझिट जप्त

उमेदवार                   मतं            मतदारसंघ

दीपकभाई पाटील        1308           आमराईवाडी
विरलकुमार गोहिल      419              भरुच
संजयभाई मकवाना     1674            भावनगर पश्चिम
कल्पेशकुमार पटेल     963              बोरसड
सुराभाई खांबालिया     815              बोताड
अरविंद राजपूत         1104              चोरयासी
जयदीपभाई वाला      270               धारी
रनमलभाई गोधम      295               द्वारका
हितेश ठाकर            278                एलिसब्रीज
www.abpmajha.in
संजयकुमार चौहान          465            गांधीनगर दक्षिण
दीपक अहिर                    245            जामनगर उत्तर
ओतमचंद हरनिया           287            जामनगर ग्रामीण
ब्रिजेश नंदा                     415             जामनगर दक्षिण
हसमुखभाई शकोरिया    360            जसदान
नरेंद्र सोराठिया               431            कामरेज
बळवंतभाई वारिया         395           कतरगाम
नथुभाई माळदे              308            खंभालिया
सम्राट पाटील               4075           लिंबायत
             www.abpmajha.in
मयुर पांचाळ               504             मांजलपूर
योगेशकुमार पटेल      203             मतर
दीपकभाई गोगरा       768             मोरबी
राहुलसिंह राजपूत      957             नरोदा
विजयकुमार पटेल     289             ओलपाड
आबाजी जाधव          620             परडी
मुकेशभाई जोशी      1097            पाटन
राजेश पंड्या            209              पोरबंदर
अश्विनकुमार चंदी    344               राधनपूर
www.abpmajha.in
निशांतभाई पटेल     230            राजकोट दक्षिण
केतन चंदरना          578             राजकोट पश्चिम
जोरुभाई पटेल        966             सनांद
विजयसिंह महिदा    1343          सावली
वाल्मिक पाटील      378             सयाजीगुंज
लालाभाई गढवी     2268          शेहरा
प्रशांत लोकरे         208            सूरत पश्चिम
विलास पाटील       2901           उधना
रणजी गोहिल        691            वाव
www.abpmajha.in

संबंधित बातम्या

'गॉडमदर'चा मुलगा गांधींच्या पोरबंदरमधून राष्ट्रवादीचा आमदार

सुरतमध्ये मराठमोळ्या संगीता पाटील यांची बाजी

गुजरातमध्ये सत्ता राखली, हिमाचलमध्ये सत्ता बदलली!

भविष्यात सेनेला डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल : आशिष शेलार

गुजरातमधील जनता भाजपवर नाराज, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

गुजरात निकालानंतर किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gujarat Election Results 2017 : Shivsena’s all 36 candidates in Gujarat lost deposits
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV