कामगिरी समाधानकारक असूनही गुजरातमध्ये काँग्रेसला मोठे हादरे

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अर्जुन मोडवाडिया, सिद्धार्थ पटेल आणि शक्तीसिंह गोहिल आदी वरिष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कामगिरी समाधानकारक असूनही गुजरातमध्ये काँग्रेसला मोठे हादरे

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपने 99, काँग्रेस 80, तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत काँग्रेसचं प्रदर्शन समाधानकारक असलं, तरीही पक्षाला मोठे हादरे बसले आहेत. अर्जुन मोडवाडिया, सिद्धार्थ पटेल आणि शक्तीसिंह गोहिल आदी वरिष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

गुजरातच्या मांडवी मतदार संघातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते शक्तीसिंह गोहिलत यांचा नऊ हजार 46 मतांनी फरकांनी पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे विरेंद्र सिंह जाडेजा यांचा 79469 मतांनी विजय झाला आहे. तर शक्तीसिंह  गोहिल यांना 70423 मतं मिळाली.

शक्तीसिंह गोहिल यांनी राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांना विजय करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती. अहमद पटेल यांच्या विजयापासून गोहिल यांचं पक्षातील आणि राज्याच्या राजकारणातील वजन चांगलंच वाढलं होतं.

दुसरीकडे पोरबंदर जागेवरुन निवडणूक लढवणारे काँग्रेसचे आणखी एक वरिष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. मोढवाडिया यांना 70575 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजप उमेदवार बाबूभाई भीमाभाई बोखीरिया यांना 74 हजार 430 मतं मिळाली.

याशिवाय गुजरातचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचे पुत्र सिद्धार्थ पटेल यांनाही दाभाई मतदार संघात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजप उमेदवार शैलेषभाई मेहतांचा विजय झाला आहे.

दरम्यान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दोन्हीही राज्यांच्या निकालांनी आपण नाराज नसल्याचं राहुल गांधी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

दोन्हीही राज्यातील निकालांनी नाराज नाही : राहुल गांधी

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: gujarat elections-results-2017-vip-seats-results-gujarat-vidhansabha-chunav
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV