सर्व्हे : मोदींच्या गुजरातचीच जीएसटी आणि नोटाबंदीवर नाराजी

गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.

सर्व्हे : मोदींच्या गुजरातचीच जीएसटी आणि नोटाबंदीवर नाराजी

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाने सर्व्हे केला आहे. यामध्ये गुजरातच्या जनतेचं मत जाणून घेण्यात आलं.

गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात करण्यात आलेल्या या सर्व्हेत 18 हजार 243 जणांनी सहभाग घेतला.

देशभरात सध्या भारतीय अर्थव्यवस्थेवरुन सरकारला विरोधकांनी सळो की पळो केलं आहे. विकासदर घटल्याने सरकारच्या अडचणी गुजरात निवडणुकीच्या तोंडावरच वाढल्या आहेत.

तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील जनतेनेच जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयावर असमाधान व्यक्त केलं आहे.

जीएसटीवर लोक काय म्हणतात?

  • 51 टक्के लोक जीएसटीवर असमाधानी

  • 38 टक्के लोक जीएसटीवर समाधानी

  • 11 टक्के लोकांनी जीएसटीवर मत मांडलं नाही


नोटाबंदीचा फायदा झाला?

  • हो – 44 टक्के

  • नाही – 33 टक्के

  • मत नाही – 3 टक्के


जीएसटीवरील नाराजी महागात पडणार?

गुजरातला एक व्यवसायिक राज्य म्हणून ओळखलं जातं. जीएसटीची अंमलबजावणी झाली तेव्हा सुरतमध्येही काही व्यापाऱ्यांनी जीएसटीला जोरदार विरोध केला होता. शिवाय या सर्व्हेमध्येही 51 टक्के लोक जीएसटीवर असमाधानी आहेत. त्यामुळे जीएसटी भाजपला महागात पडण्याची चिन्ह आहेत.

संबंधित बातमी : गुजरात सर्व्हे : हार्दिक पटेल काँग्रेससोबत, तरीही भाजप नंबर वन

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV