राहुल जगन्नाथाच्या चरणी, तर मोदी सी प्लेनने अंबाजी मंदिरात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराथी जनतेचं शक्तीपीठ असलेल्या अंबाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

राहुल जगन्नाथाच्या चरणी, तर मोदी सी प्लेनने अंबाजी मंदिरात!

गांधीनगर: गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची मंदिर डिल्पोमसी सुरुच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराथी जनतेचं शक्तीपीठ असलेल्या अंबाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दर्शनासाठी मोदी साबरमती रिव्हर फ्रंटवरुन धारोई डॅमला सीप्लेननं गेले.

मोदींच्या सीप्लेन प्रवासाआधी सकाळी सी प्लेनची चाचणी घेण्यात आली. त्यानंतरच मोदी सी प्लेननं धारोईला रवाना झाले.

तर दुसरीकडे राहुल गांधी आज अहमदाबादमध्ये जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतलं. जगन्नाथ मंदिर गुजराती जनतेचं श्रद्धास्थान आहे.

त्यामुळे या निवडणूक प्रचारात दोन्ही प्रमुख पक्षांकडून लोकांच्या श्रद्धेला हात घालण्याचा प्रयत्न जोरात सुरु आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी गुरुवारी 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gujrat election: First ever sea-plane flies in India, PM Narendra Modi 1st passenger, Rahul Gandhi visites Jagannath mandir
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV