काँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला पट्ट्याने मारलं

काँग्रेस आमदाराने सत्ताधारी भाजप आमदाराला चक्क पट्ट्याने मारलं.

काँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला पट्ट्याने मारलं

गांधीनगर (गुजरात): गुजरात विधानसभेत अभूतपूर्व राडा झाला. काँग्रेस आमदाराने सत्ताधारी भाजप आमदाराला चक्क पट्ट्याने मारलं.

विधानसभा म्हणजे राज्याच्या प्रश्नांवर उत्तरं शोधण्याचं ठिकाण. मात्र हल्ली राज्यांची सर्वोच्च सभागृह चर्चांपेक्षा खडाजंगीची मैदानंच होत आहेत. त्याचीच प्रचिती गुजरात विधानसभेत आली.

गुजरातमधील काँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला चक्क कमरेच्या पट्ट्याने मारलं. इतकंच नाही तर माईकची तोडफोड केली.गुजरातमधील काँग्रेस आमदार प्रताप दुधात यांनी भाजप आमदार जगदीश पांचाळ यांना चक्क कमरेच्या पट्ट्याने मारलं. प्रताप दुधात हे काँग्रेसचे निकोल मतदारसंघाचे आमदार आहेत.

दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विक्रम माडम यांनी माईक तोडला, तर राजुलाचे आमदार अंबरीश डेर यांनीही भाजप आमदाराला मारहाण केली.

VIDEO:

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gujrat vidhansabha : BJP MLA beatan by congress MLA
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV