गुरदासपूर पोटनिवडणूक : काँग्रेसच्या सुनील जाखड यांचा 193219 मतांनी विजय

काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड जवळपास पावणे दोन लाख मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजप लोकसभेतील एक जागा गमावण्याची शक्यता आहे.

गुरदासपूर पोटनिवडणूक : काँग्रेसच्या सुनील जाखड यांचा 193219 मतांनी विजय

गुरदासपूर : भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या गुरदासपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांनी 1 लाख 93 हजार 219 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

या निकालानंततर भाजपने लोकसभेतील एक जागा गमावली आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.

पंजाबमध्ये सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसने विधानसभेत मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर आता लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण या लोकसभा मतदारसंघात 9 विधानसभा मतदार संघ आहेत. पंजाबमधील जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपला नाकारल्यानंतर लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे.

भाजपने उद्योजक स्वर्ण सलारिया आणि आपने मेजर जनरल सुरेश खजारिया यांना उमेदवारी दिली होती. सुनील जाखड यांना 4 लाख 99 हजार 752, स्वर्ण सलारिया यांना 3 लाख 6 हजार 533 आणि सुरेश खजारिया यांना 23 हजार 579 मतं मिळाली.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV