हार्दिक पटेलची दुसरी कथित सेक्स सीडी व्हायरल

गुजरातमध्ये काल हार्दिक पटेलचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. त्यातच आता 24 तासात हार्दिकच्या कथित सेक्सची सीडी समोर आली आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 14 November 2017 1:31 PM
hardik patel gujarat assembly election another cd released

नवी दल्ली/ अहमदाबाद : गुजरातमध्ये काल हार्दिक पटेलचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. त्यातच आता 24 तासात हार्दिकच्या कथित सेक्सची सीडी समोर आली आहे.

या सीडीतील व्हिडीओत पाटीदार नेता हार्दिक पटेल असल्याचा दावा केला जात आहे. त्याच्यासोबत दोन तरुणी असल्याचंही दिसत आहे. यातील एका तरुणीसोबत तो आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. दरम्यान, या व्हिडीओची एबीपी न्यूजने पडताळणी केलेली नाही.

हार्दिक पटेलचा काल संध्याकाळी एक कथित सेक्सचा व्हिडीओ समोर आला होता. ज्यात हार्दिक पटेल एका महिलेसोबत असल्याचा दावा केला जात होता.

हार्दिकची कालची कथित सीडी अश्विन सांकडसरिया यांनी समोर आणली होती. या व्हिडीओतील व्यक्ती ही हार्दिक पटेल असून, त्याच्यासोबत एक महिलाही असल्याचा दावा सांकडसरिया यांनी केला होता.  पण हा व्हिडीओ फेक असल्याचं हार्दिक पटेलने सांगितलं होतं.

विशेष म्हणजे, 5 नोव्हेंबरला एबीपी न्यूजशी बोलतानाच हार्दिक पटेलने शंका व्यक्त केली होती की, येत्या काही दिवसात अशाप्रकारची सीडी समोर आणली जाऊ शकते.

दरम्यान, हार्दिकच्या कथित सेक्स सीडी प्रकरणानंतर गुजरातचं राजकारण चांगलच तापलं आहे. या प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. हार्दिकची कथित सीडी समोर आणणारी व्यक्ती भाजपच्या जवळची असल्याचे म्हटले जात आहे.

हार्दिकची ज्याने सीडी समोर आणली, त्या अश्विन सांकडसरिया या व्यक्तीचा भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे कथित सीडीचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

संबंधित बातम्या

VIDEO: हार्दिक पटेलचा तरुणीसोबतचा कथित व्हिडीओ

हार्दिकची कथित सीडी समोर आणणारी व्यक्ती भाजपच्या जवळची?

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:hardik patel gujarat assembly election another cd released
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘जीएसटी आणि नोटाबंदीवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावं’
‘जीएसटी आणि नोटाबंदीवर टीका...

नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेची क्षमता ओळखायला मूडीजला थोडा

दिल्ली मेट्रोत महिला पत्रकाराशी छेडछाड, सीसीटीव्हीमुळे आरोपी गजाआड
दिल्ली मेट्रोत महिला पत्रकाराशी...

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोत एका महिला पत्रकाराशी छेडछाड झाल्याचं

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची...

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांची

दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण
दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या...

श्रीनगर : दहशतवादी संघटनेत सामील झालेला काश्मीरचा फुटबॉलपटू माजिद

मूडीजच्या मते भारतात 'अच्छे दिन', 13 वर्षांनी रेटिंगमध्ये वाढ
मूडीजच्या मते भारतात 'अच्छे दिन', 13...

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्रातील मोदी

'मूडीज'च्या रँकिंगनंतर शेअर बाजारात मोठी उसळी
'मूडीज'च्या रँकिंगनंतर शेअर बाजारात...

मुंबई : ‘मूडीज’नं भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केल्यानंतर आज

नोएडात भाजप नेत्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू
नोएडात भाजप नेत्याच्या कारवर...

नोएडा : नोएडामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेत्याच्या कारवर

तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते : सर्व्हे
तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपसाठी एक चांगली

'मिशन 150'साठी भाजपचा 'मास्टर प्लॅन'
'मिशन 150'साठी भाजपचा 'मास्टर प्लॅन'

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत 150 जागा मिळविण्यासाठी भाजपनं

गे तरुणाचा लग्नाचा प्रस्ताव, शशी थरुर म्हणतात...
गे तरुणाचा लग्नाचा प्रस्ताव, शशी थरुर...

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या थिरुवनंतपुरचे