ही निवडणूक खरी असेल तर भाजप विजयी होणार नाही : हार्दिक पटेल

ही भाजपची जुनी चाल आहे, ईव्हीएमचा घोळ लक्षात येऊ नये, म्हणून असं केलं जातं, असा आरोप हार्दिकने केला आहे.

ही निवडणूक खरी असेल तर भाजप विजयी होणार नाही : हार्दिक पटेल

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या जिव्हारी लागली आहे. ही भाजपची जुनी चाल आहे, ईव्हीएमचा घोळ लक्षात येऊ नये, म्हणून असं केलं जातं, असा आरोप हार्दिकने केला आहे.

''एक्झिट पोलमध्ये जाणीवपूर्वक भाजपचा विजय दाखवण्यात आला आहे. जेणेकरुन ईव्हीएममध्ये काही घोळ असेल तरीही तो लपवला जाईल. भाजपची ही जुनी चाल आहे. ही निवडणूक खरी असेल तर भाजपचा विजय होणार नाही'', असं ट्वीट हार्दिक पटेलने केलं आहे.

गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल समोर आले. यामध्ये भाजपचा विजय होत असल्याचं समोर आलं. तर काँग्रेसचा पुन्हा एक पराभव होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

एबीपी-सीएसडीएसच्या एक्झिट पोलनुसार, 182 सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपला 117, काँग्रेस 64 आणि इतर पक्षाला एक जागा मिळत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसच्याही जागांमध्ये वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या :

गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी


गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी


गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी!

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: hardik patel reaction after Gujarat exit poll
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV