EVMसोबत छेडछाड करुन विजय मिळवणाऱ्या भाजपला शुभेच्छा : हार्दिक पटेल

‘कोणालाही शंका येऊ नये अशा पद्धतीनं ईव्हीएमशी छेडछाड करुन भाजपनं हा विजय मिळवला आहे.’ असा आरोप हार्दिक पटेलनं केला आहे.

EVMसोबत छेडछाड करुन विजय मिळवणाऱ्या भाजपला शुभेच्छा : हार्दिक पटेल

गांधीनगर : गुजरात निवडणुकीचे निकालाचं काम सुरु असतानाच पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘कोणालाही शंका येऊ नये अशा पद्धतीनं ईव्हीएमशी छेडछाड करुन भाजपनं हा विजय मिळवला आहे.’ असा आरोप हार्दिक पटेलनं केला आहे.

‘मी कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरु करणार आहे. पण या निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आला होता एवढं नक्की.’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

‘छेडछाड करुन विजय मिळवणाऱ्या भाजपला शुभेच्छा’
‘ईव्हीएमशी छेडछाड करुन विजय मिळवणाऱ्या भाजपला मी शुभेच्छा देतो की, येत्या पाच वर्षात आमच्यासारख्या आंदोलनकर्त्यांवर त्यांना अत्याचार करावे लागतील. आम्ही जेलमध्ये जाण्यासही तयार आहोत. आमचं आंदोलन सुरुच राहिल.’ असं हार्दिकनं ठणकावून सांगितलं.

‘ईव्हीएमविरोधी मोहीम सुरु करणं गरजेचं’
‘धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी ईव्हीएम सील करण्यात आलेच नव्हते. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मतदारसंघातील काही भागात असे प्रकार झाले होते. त्याशिवाय काही आदिवासी भागातही असे प्रकार झाले होते. हार आणि जीत होत असतेच. पण काँग्रेस आणि विरोधकांनी आता ईव्हीएमविरोध मोहीम सुरु करणं गरजेचं आहे.’ असंही हार्दिक पटेल यावेळी म्हणाला.

‘भाजपनं पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकली’
‘गुजरातच्या जनतेनं जो काही निर्णय घेतला होता तो चांगलाच होता. पण भाजपनं पैसा आणि घाणेरड्या राजकारणाच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. कोणीही शंका घेऊ नये अशा पद्धतीनं त्यांनी ईव्हीएममध्ये त्यांनी बदल केले. अशीही माहिती मला मिळाली आहे.’ अशी टीका यावेळी हार्दिकनं केली आहे.

‘एटीएम हॅक होतं, मग ईव्हीएम का नाही?’
‘एटीएम हॅक होतं तर ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही? त्यामुळे या निवडणुकीत ईव्हीएम हॅक करुन हा विजय मिळवण्यात आला आहे. आज काही देशांकडे प्रचंड तंत्रज्ञान आहे. पण तरीही तिथं निवडणूक ही बॅलेट पेपरचा वापर करुनच घेतली जाते. मग आपल्याकडेच ईव्हीएमचा वापर का केला जातो.’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘मी भित्र्यासारखा घरात बसून राहणार नाही’
‘मला जे मिळवायचं ते मी मिळवलं. जे गमवयाचं होतं ते गमावलं. पण यापुढेही मी संघर्ष करत राहणार. मी भित्र्यासारखा घरात बसून राहणार नाही. यापुढेही आमचं आंदोलन सुरुच राहिल. कारण या निवडणुकीत अत्याचारी आणि अहंकारी लोकांचा पराभव झाला पाहिजे हाच आमचा प्रयत्न होता.’ असंही हार्दिक यावेळी म्हणाला.
दरम्यान, हार्दिक पटेलनं भाजपवर थेट आरोप केल्यानं आता भाजप याला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठिंबा : मोदी

या निवडणुकीतही मोदींना ‘हा’ इतिहास बदलता आला नाही!

जनतेने मोदींच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं : मुख्यमंत्री
‘गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल’, राहुल गांधींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

राहुल गांधींच्या मुलाखतीने आचारसंहिता भंग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

गुजरातचा रणसंग्राम : दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान

गुजरातचा सर्वात मोठा एक्झिट पोल

भावाच्या पाया पडून मोदींचा रोड शो, काँग्रेसची तक्रार

'रोमँटिक रिलेशनशिप'मुळे लग्नाच्या दिवशीच शिक्षक जोडप्याची हकालपट्टी

गुजरातचा एक्झिट पोल: मध्य गुजरातचा कौल भाजपला!

गुजरातचा एक्झिट पोल: दक्षिण गुजरातमध्ये कमळ फुलणार

गुजरातचा एक्झिट पोल: सौराष्ट्र-कच्छमध्ये भाजपची मुसंडी

गुजरातचा एक्झिट पोल: उत्तर गुजरातमध्ये भाजप मोठा पक्ष

गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी!

गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी

ही निवडणूक खरी असेल तर भाजप विजयी होणार नाही : हार्दिक पटेल

निकालापूर्वी ईव्हीएममध्ये घोळ करुन भाजप जिंकणार : हार्दिक पटेल

गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार नाही : खा. संजय काकडे

गुजरात : सहा केंद्रांवर पुन्हा मतदान, निवडणूक आयोगाचे आदेश

2004 ते 2016, यापूर्वी चुकीचे ठरलेले एक्झिट पोल

5 हजार EVM हॅकिंगसाठी गुजरातमध्ये 140 इंजिनिअर तयार : हार्दिक पटेल

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Hardik Patel’s serious allegation against BJP in Gujarat elections latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV