बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्याला फाशी

धक्कादायक म्हणजे हरियाणात गेल्या आठवड्याभरात बलात्काराच्या 9 घटनांची नोंद झाली आहे. यापैकी तीन घटना गुरुवारी घडल्या.

बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्याला फाशी

चंदिगढ : बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्याला दोषीला थेट फाशीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद हरियाणा सरकार करणार आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर क्रांतिकारी पावलं टाकण्याच्या तयारीत आहेत.

'गेल्या काही दिवसात झालेल्या घटनांमुळे मी प्रचंड दुखावलो आहे. त्यामुळे आम्ही कठोर निर्णय घेण्याच्या विचारात आहोत. जर 12 वर्षाखालील बालिकेवर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं, तर दोषीला सर्वोच्च शिक्षा सुनावण्यात यावी, असा कायदा आम्ही करणार आहोत.' असं खट्टर शनिवारी म्हणाले.

'घटना पडताळून पाहिल्याशिवाय जी सनसनी केली जाते, ती होता कामा नये' असंही मत खट्टर यांनी व्यक्त केलं. या शिक्षेची तरतूद असणारं विधेयक लवकरच विधानसभेत आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.धक्कादायक म्हणजे हरियाणात गेल्या आठवड्याभरात बलात्काराच्या 9 घटनांची नोंद झाली आहे. यापैकी तीन घटना गुरुवारी घडल्या.

सातवीत शिकणाऱ्या एका दलित विद्यार्थिनीला घराबाहेरुन पकडून चौघांनी तिच्यावर चाकूच्या धाकाने बलात्कार केला. 20 वर्षीय तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याचं समोर आलं, तर बीए सेंकड इयरच्या विद्यार्थिनीवर चालत्या गाडीत दोघांनी गँगरेप केला होता.

यापूर्वी, मध्य प्रदेश सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा ठोठावण्याचं विधेयक मंजूर केलं होतं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Haryana CM Khattar talks of capital punishment if girls below 12 is raped latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV