चेन्नईला मुसळधार पावसानं झोडपलं, जनजीवन विस्कळीत

तामिळनाडूची राजधानी चेन्नईला पावसानं काल संध्याकाळपासून चांगलंच झोडपलं आहे.

चेन्नईला मुसळधार पावसानं झोडपलं, जनजीवन विस्कळीत

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईला पावसानं काल (गुरुवार) संध्याकाळपासून चांगलंच झोडपलं आहे. कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य चेन्नईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे चेन्नईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली होती.

दरम्यान, पावसामुळे आयटी कंपन्या बंद ठेवण्याचा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. जागोजागी मोठ्याप्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली गेली आहेत. तर मरीना बीचवरील रस्त्यांना कालच्या पावसामुळे नद्यांचं स्वरूप आलं होतं. यामुळे परिवहन मंडळाची वाहनेही रस्त्यावर उतरली नाहीत. त्यामुळे संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.

हवामान विभागाने तामिळनाडू राज्याच्या तटवर्ती परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. आणि येत्या काही तासांतही चेन्नई शहरासह राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Heavy raining in Chennai Massive Water logging in City
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV